गाईडचे राज्य पुरस्कार परीक्षा रामटेक येथे संपन्न

0
363

गाईडचे राज्य पुरस्कार परीक्षा रामटेक येथे संपन्न

 

खापरखेड़ा : भारत स्काऊट्स आणि गाईड्स व महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या अधीनस्थ गाईड्सचे राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न झाली.
तीन ते पाच मार्च 2022 या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे आयोजित या राज्य पुरस्कार परीक्षेत नागपुर विभागातील एकूण सहा जिल्ह्याचे एकशे सहा गाईड्स आणि वीस गाईड्स कैप्टन यांनी सहभाग घेतला. या परीक्षेत स्थानिक खापरखेडा व पारशिवनी येथील गाईड्सनी सहभाग घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे गाईड्स पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रपति पुरस्कार परीक्षामध्ये सहभागी होणार आहेत.
गाईड्सच्या या राज्य पुरस्कार परीक्षा शिबिरमध्ये शिबिर प्रमुख व सहायक राज्य संघटन आयुक्त (गाईड) माधवी मुरमाडे, परीक्षक रुपाली सूर्यवंशी, वैशाली अवथळे, दीपा मडावी, चेतना ब्रम्हणकर इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here