सीएसटीपीएसच्या उपकार्यकारी अभियंत्याने पत्नीच्या जन्मदिनानिमित्त केली मजुरांना धान्याची किट वाटप

0
432

सीएसटीपीएसच्या उपकार्यकारी अभियंत्याने पत्नीच्या जन्मदिनानिमित्त केली मजुरांना धान्याची किट वाटप

चंद्रपूर/प्रतिनिधी : सीएसटीपीएसचे उपकार्यकारी अभियंता दिनेश डोंगरे यांनी आपल्या पत्नीच्या जन्मदिवसानिमित्त कोरोनामुळे हतबल झालेल्या हातावर आणून खाणाऱ्या मजूर बांधवांना प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचच्या माध्यमातून धान्य किट वाटप करत पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अनोखे कार्य करून आदर्श घातला.
मुलाच्या जन्मदिवसानिमित्तही सरांनी शाळेतील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना 50 स्कुल बॅग आणि वृद्धाश्रमाला 23 खुर्च्या दान देण्यात आल्या होत्या.
मागील वर्षीही कोरोना काळात सतत चार महिने प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे गरजू लोकांना धान्य किट वाटपाच्या उपक्रमास आर्थिक सहकार्य स्वतःहून केले.
अशा या डोंगरे कुटुंबास प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तर्फे मानाचा सलाम करत डोंगरे सरांच्या पत्नीचा म्हणजेच भारती दिनेश डोंगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचचे विनोद आर सोनटक्के यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here