छत्तीसगढ राज्यातून येणाऱ्या अनधिकृत प्रवासी गाड्या बंद करा – आमदार डॉ देवरावजी होळी

0
341

छत्तीसगढ राज्यातून येणाऱ्या अनधिकृत प्रवासी गाड्या बंद करा – आमदार डॉ देवरावजी होळी

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक

नागरीकांच्या सुविधेसाठी परवाना (लायसन्स) कॅम्प आयोजीत करण्याची केली सूचना

 

गडचिरोली, सुखसागर झाडे

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरू असून छत्तीसगढ राज्यातून येणाऱ्या अनधिकृत प्रवासी गाड्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे जिल्हयात प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे . या अनधिकृत प्रवासी गाड्या तात्काळ बंद करण्यात याव्या. असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली यांना आढावा बैठकीत दिले.

आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीपूर्वी त्यांनी संपुर्ण कार्यालयाची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयजी चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी नागरीकांच्या सुविधेसाठी अधिकाधिक परवाना (लायसन्स ) कॅम्प आयोजीत करण्याची सूचना करीत अधिकाधिक नोंदणी करण्यासाठीं आर. टी. ओ. कार्यालयाने पुढाकार घ्यावा असे निर्देश दिले.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रवासी वाहतूक सुरू आहे त्याची तपासणी करण्याची आवश्यकता असून छत्तीसगढ राज्यातून पेंढरी, धानोरा मार्ग येणाऱ्या अनधिकृत प्रवासी गाड्या जिल्ह्यातील स्थानिकांचे नुकसान करणाऱ्या असल्याने त्या तात्काळ बंद करण्यात याव्या असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here