कारवायांचे सत्र जाेरात ! अवैध रेती तस्करांत उडाली खळबळ !

0
486

कारवायांचे सत्र जाेरात ! अवैध रेती तस्करांत उडाली खळबळ !

चंद्रपूरचे एसडीआे राेहन घुगे यांनी केल्या कारवाया ! गाेंडसावरीतही पकडला माेठा रेती साठा ! !

🟢💠 चंद्रपूर 🔵🟢किरण घाटे 🟢🟣चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिज उत्खननच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या अवैध उत्खननावर अंकुश तथा दंडात्मक कारवाया करण्यांसाठी जिल्हाभर धडक माेहिम राबविल्याचे चित्र सध्या द्रूष्टीक्षेपात पडत आहे .🟢🟣🔵🟡ही माेहीम यशस्वी करण्यांसाठी सर्व उपविभागीय अधिकारी , खनिकर्म अधिकारी, तहसीलदार , नायब तहसीलदार , मंडळअधिकारी , पटवारी या शिवाय महसुल विभागाचे पथक तसेच खनिकर्म विभागाचे पथक दिवस रात्र तारेवरची कसरत करीत आहे .🟡🟪🔵🌼🟢 दरम्यान चंद्रपूर महसुल विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी प्राणाची पर्वा न करता आपल्या पथकासह गुरुवार दि.३डिसेंबरला रात्री दाेन वाजता अजयपूर तलाठी साज्यातील गाेंडसावरी येथील अंधारी नदी पात्राजवळ असलेला अंदाजे १८०ब्रास अवैध रेतीसाठा या शिवाय हाँयवा व जेसीबी जप्त केल्याचे व्रूत्त आहे .🟡🟢🟣🟪एवढेच नाही तर एसडीआे राेहन घुगे यांनी शुक्रवार दि .४डिसेंबरला सकाळी सात वाजता पडाेली येथे एका अवैध रेती वाहनांस दंडात्मक कारवाईसाठी जप्त केले आहे .🔵🟣🟡💠घुग्गुस येथील अवैध रेती वाहतुकीवर अंकुश बसविण्यासाठी त्याच बराेबर अवैध रेती वाहने पकडण्यांकडे आपण जातीने लक्ष पुरविले असल्याचे आज सांयकाळी एका भेटी दरम्यान घुगे यांनी आमचे प्रतिनिधी साेबत बाेलतांना सांगितले .🟣🟢🟡🌀उपरोक्त केलेल्या सर्व कारवायां मध्ये त्यांना नायब तहसीलदार राजू धांडे , तलाठी प्रकाश सुर्वे , शैलेष दुव्वावार व विशाल कुरेवार यांनी सहकार्य केले . 🟣🔵🟢🟡एसडीआे राेहन घुगे यांनी गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहनांवर कारवाया आरंभ केल्यामुळे चंद्रपूर तालुक्यातील अवैध रित्या रेती नेणां-या रेती माफियात अक्षरशा खळबळ उडाली आहे हे सूर्य प्रकाश इतके सत्य आहे 🟡🟣🟢💠.उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांनी केलेल्या धडक कारवायांचे नागरिकांकडुन स्वागत हाेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here