दारुबंदी उठल्यानंतर चंद्रपूर जिल्हा वासियांचे लक्ष वेधले आता शासनाच्या अधिसुचनेकडे !

0
822

 

चंद्रपूर -किरण घाटे -विशेष प्रतिनिधी – विदर्भातील गडचिराेली – वर्धा या दाेन जिल्ह्यात आधीच दारुबंदी आहे .त्या नंतर कामगार जिल्हा म्हणून आेळखल्या जाणां-या चंद्रपूर जिल्ह्यात गत पांच वर्षापुर्वि दारुबंदी करण्यांत आली हाेती .दारुबंदी केल्यानंतरही या जिल्ह्यात दारुचा महापूर वाहु लागला हाेता .पाेलिस कारवायांही तेवढ्याचं माेठ्या प्रमाणात झाल्या हाेत्या.पण दारु विक्रीचे प्रमाण काही हाेईना कमी झाले नव्हते .सुशिक्षित बेराेजगारां साेबतचं शालेय विद्यार्थींनी व महाविद्यालयींन तरुणी दारु विक्रीच्या कामाला लागल्या हाेत्या , दारु विक्री करण्यांत महिलाही मागे नव्हत्या .एकंदरीत जिल्हाभर दारु विक्रीचे चित्र सर्वत्र द्रूष्टीक्षेपात पडत हाेते .सर्वाधिक ताण पाेलिस विभागावर पडत हाेता .अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवावी असा जनतेचा आग्रह हाेता .त्यानंतर जिल्हास्तरावर एका समितीची निर्मिती करण्यांत आली .सदरहु समितीने या संदर्भात सर्वांचे अभिप्राय मागविले .त्यात दारुबंदी उठविणा-यांची संख्या सर्वाधिक हाेती असे बाेलल्या जाते . नुकतीच महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यांची घोषणा केली आहे आता अधिसूचना केव्हा निघते या कडे सा-या चंद्रपूरकरांसह संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष केन्द्रीत झाले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here