डेबूजी सावली वृद्धाश्रमात काँग्रेस तर्फे आ. विजय वड्डेटीवारांचा वाढदिवस साजरा

0
614

डेबूजी सावली वृद्धाश्रमात काँग्रेस तर्फे आ. विजय वड्डेटीवारांचा वाढदिवस साजरा

 

घुग्घूस : महाराष्ट्राचे माजी मंत्री जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ओबीसी नेते काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घूस शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या वतीने डेबूजी सावली वृद्धाश्रम येथे स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. आश्रमातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकां सह एकत्रितपणे बसून भोजन करण्यात आले.

त्यांच्या सोबत मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. गीतगायन व भजन कार्यक्रम घेण्यात आले माजी मंत्री याच्या करीता प्रार्थना घेण्यात आली.

याप्रसंगी डेबूजी आश्रमाचे सदस्या सौ. निशा धोंगळे यांनी आश्रमाची परिपूर्ण माहिती उपस्थितांना दिले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख,रोशन दंतलवार, मोसीम शेख,देव भंडारी, साहिल सैय्यद,रोहित डाकूर, विशाल मादर, दिपक पेंदोर,शाहरुख शेख,कपिल गोगला, अंकुश सपाटे, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here