रात्रीस खेळ चाले गोवंश तस्करीचा… कधी संपेल खेळ हा तस्करीचा… बोला, साहेब बोला!!! जनावर तस्करांना आशीर्वाद कोणाचे ??? बोला, साहेब बोला!!!

0
445

रात्रीस खेळ चाले गोवंश तस्करीचा… कधी संपेल खेळ हा तस्करीचा… बोला, साहेब बोला!!!

जनावर तस्करांना आशीर्वाद कोणाचे ??? बोला, साहेब बोला!!!

राजुरा । राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असून त्या नियमाला धाब्यावर मांडून तस्करांकडून पोलीस प्रशासन गाढ झोपेत असताना रात्रपाळीत तस्करीचा खेळ सुरू आहे. मोठया प्रमाणात तालुक्यात हा खेळ रंगला असून ठाणेदार साहेब आपण अनभिज्ञ कसे? यावर आळा कधी बसणार! बोला, साहेब बोला!!!

रोज रात्री राजुरा विहिरगाव मार्गे व राजुरा वरूर रोड मार्गे तेलंगणात गोवंश तस्करी करणारी वाहने सुसाट वेगाने पळतात. सर्वसामान्य जनतेत हि चर्चा चांगलीच रंगली असून पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होत असलेल्या तस्करीला पाठबळ कोणाचे? आपली अनुमती आहे का? बोला, साहेब बोला!

कुंपनच शेत खात असेल तर कर्तव्यदक्षता पार पडत आहे का? आपला कार्यकाळ संपेपर्यंत पुन्हा किती अवैध धंद्यांना ऊत येईल… बोला, साहेब बोला!!!

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here