नांदा ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारीच मिळेना…

0
392

नांदा ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारीच मिळेना…

ग्रामविकास अधिकारी २ दिवस तर प्रशसाक १ दिवस हजर

एकच ग्रामविकास अधिकारी चालवतो तीन ग्रामपंचायतीचा डोलारा…

 

 

नांदा फाटा :- कोरपना तालुक्यातील श्रीमंत व सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नांदा ग्रामपंचायतीची ओळख आहे. परंतू मागील एक वर्षा पासून नांदा ग्रामपंचायत कारभार प्रभारी चा खांद्यावरून चालत असून कायम स्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळेना असे झाले आहे.

 

ग्राम पातळीवर शासकीय योजना पोहोचविणे.सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, त्याची पराकाष्टा करणे, आर्थिक कारभार पाहणे, विकास कामांना चालना देणे, लोकांचा व शासनाचा दुआ म्हणून ओडखल्या जाते. मात्र नांदा ग्राम पंचातीला कायम स्वरुपी ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने विकास कामात व वेगवेगळ्या कामाकरिता येत असलेल्या नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे.

 

 

ग्रामविकास अधिकारी एकाच गावाला वेळ देवू शकत नसल्याने तेथील कामे रखडली आहे. कामांना गती येण्या ऐवजी कामात बाधा येत असताना दिसत आहे. रोजच नागरिकांना आपल्या वयक्तिक किंवा शासकीय कामाकरिता दाखल्याची आवश्यकता भासत असते. मात्र ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीला अधिकाचा वेळ देऊ शकत नसल्याने दाखल्या साठी नागरिकांना ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे दिसून येत आहेत.

 

 

आठवड्यातून २ दिवस हजर..
तीन ग्राम पंचायतीचा डोलारा सांभाळत असल्याने आठवडयातील २ दिवस एका ग्रामपंचायतीला द्यावे लागते त्यातच पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मिटींग असल्यास त्या दिवसातही विर्जन पडत असते. त्यामुळे नागरिकांना ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतिला कधी येणार याची वाटच बघत राहवे लागते.

 

 

प्रशासक आठवड्यातून १ दिवस
मागील वर्षी ग्रामपंचायत समिती बरखास्त झाल्याने. प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक हे स्वतः प्रभारी गट विकास अधिकारी होते त्यामुळे त्यांना वेळ अपुरा मिळत असल्याने ग्रामपंचायतीला एक दिवस ते ही काही तासा येत होते. आता प्रभार गेला असला तरी क्वचितच निदर्शनास येते.

 

 

कोरपना तालुक्यातील नांदा, पिंपळगाव, लाखमापूर, या तीन ग्रामपंचायतीचा कारभार मागील 1 वर्षा पासून एकच ग्रामविकास अधिकारी पाहत आहेत. ग्रामपंचायतीची लोकसंख्या अनुक्रमे अंदाजे 20000, 3000, 5000 हजार,लोकसंख्येचे गाव आहेत विविध कामाकरिता नागरिक ग्रामपंचायतिची धाव घेत असते मात्र ग्रामविकास अधिकारी राहत नसल्याने आल्या पाऊली परत हिरमूसून घरी जावे लागते.

 

नांदा ग्रामपचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असल्याने विविध कारनानी नेहमीचा प्रकाश झोतात असते. मागील १ वर्षा पासून ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती झाली असताना देखील पंचायत समिती येथे रुजू न झाल्याने तालुक्यातील सर्वात मोठा ग्राम पंचायतीचा डोलारा हा प्रभारी ग्रामविकास अधिकारी चालवीत आहे.

 

“नांदा ग्रामपंचायत येथे नियुक्त असलेल्या ग्राम विकास अधिकारी हे अजूनही पंचायत समितीला रुजू न झाल्यामुळे नांदा ग्राम पंचायतीचा कारभार प्रभारी ग्रामविकास अधिकारी यांचा कडे दिली आहे.” 
विजय पेंदाम गट विकास अधिकारी कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here