भाजपा शहराध्यक्षांना महावितरणच्या खजिनदाराकडून असभ्य वागणूक

0
424

भाजपा शहराध्यक्षांना महावितरणच्या खजिनदाराकडून असभ्य वागणूक

तीन दिवसात कारवाई करा अन्यथा आंदोलन, वरिष्ठांकडे तक्रार

 

 

कोरपना/प्रतिनिधी
गडचांदूर महावितरण कार्यालयातील खजिनदाराने गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार सोबत अरेरावी करून असभ्य वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. उपलेंचीवार हे 28 जून रोजी दुपारच्या सुमारास महावितरण कार्यालयात काही समस्या घेऊन उपकार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले होते. दरम्यान बील भरायला आलेल्या ग्राहकांचे बील वेळ संपली म्हणून खजिनदाराने काउंटर खिडकी बंद करून स्विकारले नाही. याची माहिती एका वीज ग्राहकांने उपलेंचीवार यांना दिली. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी उपलेंचीवार कार्यालयाच्या आत त्या खजिनदाराकडे गेले असता खजिनदाराला याविषयी “तुम्ही आत कसे आले, बाहेर व्हा, बिल भरण्यची वेळ संपली.” अशा प्रकारे अरेरावी करत खजिनदाराने नियम, कायदा दाखवला. उपलेंचीवार यांनी विनंतीपुर्वक समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तो समजण्याच्या परिस्थितीत दिसत नव्हता. असेच प्रकार इतर ग्राहकांबरोबर सुद्धा घडत असल्याची माहिती असल्याने उपलेंचीवार कमालीचे संतप्त असून याची लेखी तक्रार महावितरणाच्या वरिष्ठांकडे करण्यात आली असून तीन दिवसात खजिनदारावर कारवाई करावी अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे याठिकाणी ग्राहकांच्या बिलांची रक्कम स्वीकारण्यासाठी नेहमी महिला असते. तीच्या अनुपस्थितीत पुरूष खजिनदार होता आणि हा प्रकार घडला. निवेदन देताना उपलेंचीवार यांच्या सोबत हरिश घोरे, अजीम बेग, महेश घरोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आता याविषयी महावितरणाचे वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

‘आम्हाला अर्धा तासांपासून बसून ठेवले आणि आता म्हणत आहे, वेळ संपली उद्या या! थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी घरोघरी जातात आणि आम्ही वेळात वेळ काढून बील भरण्यासाठी येथे आलो तर हे लोकं असे करत आहे, आता काय सांगायचं यांना! अशी भावना काही ग्राहकांकडून व्यक्त होताना दिसली.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here