गडचांदूर येथे केअर कोविट सेन्टर उभारण्यात यावे !

0
661

गडचांदूर येथे केअर कोविट सेन्टर उभारण्यात यावे !!
कोरपना तालुका भाजपाची मागणी 

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर — सम्पूर्ण देश्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून चंद्रपूर जिल्हात सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आता चंद्रपूरचे सरकारी रुग्णालय असो वा खाजगी रुग्णालय असो तेथे बेड ची कमतरता भासत आहे कित्येक रुग्णाची गैरसोयी मुळे जीव गमवावा लागत आहे.पुढे सुध्दा कोरोनाचे रुग्ण वाढीस जाण्याचे संकेत दिसत आहे.तेव्हा जिल्हावरील ताण कमी करण्यासाठी तसेच जनतेच्या सोईसाठी गडचांदूर परिसरात अंबुजा,माणिकगड,अल्ट्राटेक सिमेंट असे तीन मोठे सिमेंट उद्योग असून त्या ठिकाणी त्यांचे स्वमालकीचे रुग्णालय आहे सोबत डाँ व नर्स ,बेड,एम्ब्युलन्स व मोठं मोठे रेस्ट हॅ!ऊस उपलब्ध आहे. तेव्हा सदरचे रुग्णालय जनतेच्या सेवेकरिता केअर कोविट सेन्टर करिता उपलब्ध करून देण्यात यावी.जेणे करून याचा लाभ जिवती व कोरपना तालुका तील नागरिकांना होतील.अश्या प्रकारची मागणी कोरपना भाजपाच्या वतीने मा. तहसीलदार साहेब कोरपनाचे मार्फत मा जिल्हाधिकारी चंद्रपूर,यांना केली असून त्याची प्रतिलिपी मा राजेशजी टोपे आरोग्य मंत्री म रा मुंबई, माजी वित्त नियोजन मंत्री मा सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली आहे याप्रसंगी उपस्थित भाजपाचे कोरपना तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर ,गडचांदूर शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे, रामेशजी मालेकर,पुरुषोत्तम भोंगळे, हरीश घोरे, नगरसेवक अमोल असेकर,पद्माकर धगडी,विजय पानघाटे,सत्यवान घोटकर, ऍड. पवन मोहितकर, ओम पवार,शकिकांत आडकीने, मिलीचंद राठोड, विनोद कुमरे आदी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here