वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराच्या वतीने इफ्तार पार्टी

0
780

वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराच्या वतीने इफ्तार पार्टी

 

काल दिनांक २९/०४/२०२१ ला वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरबच्या वतीने मुस्लिम बांधवांनकरिता सामाजिक सौहार्दाने फळ वितरण आणि इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या पुढाकाराने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

फळ वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० वाजता जामा मस्जिद मध्ये रोजेदारा ना फळ वितरण करून सुरू झाला. तर शेवट अल्फलाह मस्जिद चुनाभट्टी वॉर्ड येथे कुराण शरीफ व इस्लाम धर्मातील माणुसकी जोपासायच्या उद्दात हेतू, रमजान चे विविध पैलू समजावून सांगत शेवट इफ्तार पार्टी करून झाला. कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य अमोल राऊत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी केले. तर तालुक्यातून सुशील मडावी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी राजुरा, रविकिरण बावणे महासचिव, सदानंद मडावी महासचिव, महेंद्र ठाकूर जिल्हा सदस्य, भगीरथ वाकडे जिल्हा सदस्य, रमेश लिंगंपल्लिवार जिल्हा सचिव, राहुल अंबादे, धनराज उमरे, तौफिक, अक्रम, असलम, फैजल भाई, आनंदराव अंगलवार जिल्हा उपाध्यक्ष, असलम चाऊस, प्रवृत्ती फाऊंडेशन अध्यक्ष सूरज भांबरे इत्यादी कार्यकर्ता व मस्जिद कमिटी च्य लोकांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रमाला चार चाँद लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here