गोंडपिपरित जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद

0
770

गोंडपिपरित जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद

विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांचा चाप

गोंडपिपरी(सूरज माडूरवार)

कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्याने ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशाषणाने जनता कर्फ्युचे आव्हाहन केले होते.त्याला गोंडपिपरि तालुक्यात नागरिक व व्यावसायिक उत्तम प्रतिसाद देत आहे.
विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर गांधी चौक ,शिवाजी चौक,धाबा क्रॉसिंग परिसरात ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी ब्यारीकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे.विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी तर विनामास्क असणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
अशातच मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घर कामासाठी साहित्य मिळत नसल्याने व उन्हाळा असल्याने नागरिकांच्या हाताला काम नसल्याने आता घराचे काम पूर्ण होणार या आशेत असणाऱ्या नागरिकाच्या आनंदावर विरजण पडले आहे.सोबतच हातगाडीवर फिरून वस्तू विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.मोठ्या प्रमाणात व्यवसायाला फटका बसला असून जनता कर्फ्यु सुरू झाल्याने छोट्या हातगाड्या व्यावसायकांचे हाल सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here