हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी व्हेंटिलेटर,एम.डी मेडिसिन डॉक्टर व जास्तीत जास्त बेडची व्यवस्था करण्यात यावी – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

0
427

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांसाठी व्हेंटिलेटर,एम.डी मेडिसिन डॉक्टर व जास्तीत जास्त बेडची व्यवस्था करण्यात यावी – माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

हिंगणघाट येथील व्हेंटिलेटर वर्धेच्या दवाखान्यात पाठविले ते परत हिंगणघाट ला पाठवून व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी

हिंगणघाट,अनंता वायसे (२२ एप्रिल) : उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे व्हेंटिलेटर वर्ध्याच्या दवाखान्यात पाठविले आहे ते परत हिंगणघाट ला पाठवून व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे एम.डी मेडिसिन डॉक्टरची पूर्णवेळ नेमणूक करून व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात यावी या तिन्ही मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार व जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात यावी. वर्धा येथील दोन्ही कोविड सेंटर मध्ये रुग्णांची प्रचंड वाढ झाली असून बेड खाली नाही आहे त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे तर काहींना बेड उपलब्ध न मिळाल्यामुळे मरण पावले आहे. म्हणून जास्तीत जास्त बेडची व्यवस्था करण्यात यावी.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय हे हायवे नंबर 7 वर असून हैदराबाद – नागपूर मार्गावर आहे या मार्गावर चालणारे वाहन- चालक -कंडक्टर, खाजगी वाहन धारक यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याने प्रभावित झालेल्या रुग्णांना बेडची प्राथमिक व्यवस्था होऊ शकत नाही, म्हणून प्रवाशी हतबल झाले आहे.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे चार व्हेंटिलेटर होते परंतु रुग्णालयात पूर्णवेळ एम.डी मेडिसिनचे डॉक्टर नसल्यामुळे ते बंद होते. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व्हेंटिलेटरचे संच वर्धा येथील दवाखान्यात पाठविले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे पूर्णवेळ एमडी मेडिसिन डॉक्टरची नियुक्ती करून व्हेंटिलेटर ची व्यवस्था करण्यात यावी तसेच रुग्णालयात जास्तीत जास्त बेडची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पालकमंत्री सुनील केदार व जिल्हाधिकारी वर्धा यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here