महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त “पुरोगामी पत्रकार संघाच्या” राजुरा तालुका संघटक पदी- आनंदराव देठे यांची निवड
राजुरा, 11 ऑगस्ट (राजु झाडे) : महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघ राजुरा , तालुका संघटक पदी आनंदराव देठे याची निवड करण्यात आली आहे. आनंदराव देठे हे impact24news वेब पोर्टलचे संपादक आहेत. तसेच बाळकडू वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.

पत्रकारिता करीत असताना सामाजिक क्षेत्रात अन्याय विरुद्ध लढ्यात सतत अग्रेसर असतात. त्याच्या या कार्यामुळे आणि पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर , चंद्रपूर जिल्हा प्रभारी निलेश ठाकरे, सुरज वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या द्वारे त्याची पुरोगामी पत्रकार संघ, राजुरा तालुका संघटक पदी निवड झाल्याने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकार मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.