आष्टी तालुक्यात शेतकरी बांधवाना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई द्यावी : सरपंच संघटनेची मागणी

0
445

आष्टी तालुक्यात शेतकरी बांधवाना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई द्यावी : सरपंच संघटनेची मागणी

फैजान काजी/आष्टी

सोयाबीन या पिकाचा झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना हेकटरी 50,000 रुपये मदत म्हणून देण्यात यावे अशी मांगणी आज मा.तहसीलदार साहेब आष्टी तसेच तालुका कृषी अधीकारी साहेब आष्टी यांना निवेदना द्वारे करण्यात आली.यासाठी विषेश उपस्थिती तालुका सरपंच संघटना अध्यक्ष मा. अकींतभाऊ कावले, प्रविनभाऊ ठाकरे सरपंच सूजातपुर, सुनिलभाऊ साबळे मा.सरपंच टेकोडा, प्रशांतभाऊ कठाणे शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते टेकोडा, यांनी सदर बाबतीत लवकरात लवकर पंचनामे करून मीळणारी मदत ही पूढील पिकास कामी पडेल या स्वरूपात मिळावी याची शासनाने दखल घ्यावी अशे निवेदन मा. तहसीलदार साहेबांन मार्फत शासनास करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here