कर्करोग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा प्रचार करावा -सूर्यकांत खनके
🟩🟪🟥🌀चंद्रपूर 🟪💠किरण घाटे🟪🟩 कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन टाटा ट्रस्ट व चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे विद्यार्थी वृंदासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

🟩🟪💠🟥या दिना निमित्ताने विद्यार्थ्यांना कर्करोगा बाबत जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात आले . कर्करोगाची विद्यार्थ्यांद्वारे समाजामध्ये जनजागृती करण्यात यावी यासाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन टाटा ट्रस्टसच्या माध्यमातून जागतिक कर्करोग दिन नुकताच साजरा करण्यात आला.
🟡💠🟨🟪🟣🟩शालेय विद्यार्थांना खर्रा, सुपारी, पान, जर्दा याचे शरीरावर होणारे वाईट परिणाम तसेच मुखाचा, स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग याची देखील माहिती देण्यात आली.
🟪💠🛑🟡🟣🟩 यावेळी, कर्क रोग विषयक विशेष कार्यक्रमाप्रसंगी गोंडवना शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य सूर्यकांत खणके, मुख्याध्यापक संजय बीजवे, संध्या वाढई, टाटा ट्रस्टचे जिल्हा प्रकल्प, व्यवस्थापक डॉ. रोशन मेंढे, प्रकल्प समन्वयक सुरज साळुंके, आशिष सुपासे व महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
🟪💠🟡🟢🟥🛑डॉ. रोशन मेंढे यांनी माहिती देतांना लवकर निदान व योग्य उपचारांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व्यसनाधीन होऊ नये तसेच कर्करोग कशामुळे होतो व त्याची लक्षणे, धोके व उपचार याविषयी माहिती दिली. कर्करोग होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये मुख कर्क रोगा विषयी माहिती आशिष सुपासे यांनी दिली.