स्थानिक प्रशासन ‘कोमात’ शिवसेना ‘जोमात’, शहर प्रमुख करतात निर्जंतुकीकरण व फगींग फवारणी

0
511

स्थानिक प्रशासन ‘कोमात’ शिवसेना ‘जोमात’, शहर प्रमुख करतात निर्जंतुकीकरण व फगींग फवारणी

कोरोना काळात फक्त शिवसेनाच जनतेच्या सेवेत

वणी/प्रतिनिधी : सद्या वणी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असुन रुग्ण संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु कोरोनाचा रोकथाम करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह, संबंधित यंत्रना चांगलीच सुस्त असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून शिवसेनेने पुढाकार घेतला असुन शिवसेना वणी शहर प्रमुख राजु तुराणकर, प्रवीण खानझोडे यांचे उपस्थितीत शहरात स्वच्छता अभियान राबविने, सॅनिटायझर निर्जंतुकीकरण फवारणी असे उपक्रम सुरू करण्यात आले आहे.
फगींग मशिनद्वारे शहरातील काळे लेआऊट, पंचशीलचौकाच्या मुख्य रस्त्याने, गुरूनगर, जनता शाळे जवळ, पेरसापेन होस्टेल व गणेश गृहनिर्माण सोसायटी या परिसरात फोगिंग फवारणी करण्यात आली. मंगल भोंगळे शाखा प्रमुख जनार्दन थेटे, सचिन ठावरी यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.
या कोरोना काळात शिवसेनेने पुढाकार घेतल्याने नागरीक समाधान व्यक्त करीत असून वणी नगर परिषद यांनी कोणतीच फवारणी केली नाही किंवा कोणताच पुढारी, लोकप्रतिनिधी, जनतेला मदत करताना दिसत नाही. त्यामुळे शिवसेना जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here