आमदार किशोर जोरगेवार यांनी मुल मार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेत केली आर्थिक मदत

0
499

आमदार किशोर जोरगेवार यांनी मुल मार्गावरील अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेत केली आर्थिक मदत

 

 

चंद्रपूर-मुल मार्गावरील अजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या ५ कामगारांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे स्वगाव लावारी येथे जाऊन सांत्वनपर भेट घेतली असुन त्यांना आर्थिक मदत केली आहे. घटनेनंतर एकही अधिकारी सदर गावात पोहचला नसल्याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी संतापही व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ मुतकांच्या कुटुंबियांना भेट देण्याच्या सूचना केल्या आहे.

 

 

यावेळी लावारीचे सरपंच योगेश पोतराजे, उपसरपंच सुनिता राजुरकर, लावारीचे ग्रामपंचायत सदस्य धीरज नीरंजने, दहेलीचे उपसरपंच अक्षय देरकर, पोलीस पाटील शंकर निरंजने, बल्लारपूरचे सामाजिक कार्यकर्ते सतीश नाईक, रोहित पंदिलवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलिम शेख, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कूळमेथे, विलास सोमलवार, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, राम जंगम, विश्वजित शाहा, विलास वनकर, अॅड. परमहंस यादव, विनोद अनंतवार, तिरुपती कलगुरुवार, बबलु मेश्राम, बादल हजारे आदींची उपस्थिती होती.

गुरुवार रात्रोच्या सुमारास लाकडणाने भरलेला ट्रकची डिझेल टँकरशी समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहणांनी पेट घेतला. हि आग इतकी भीषण होती की यात ट्रक मधील सहा कामगार. वाहणचालक आणि डिझेल टँकर मधील वाहण चालक व मजूर यांचा जळुन मृत्यु झाला. यात बल्लारपूर तालुक्यातील सात कामगारांचाही समावेश होता. दरम्याण आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी लावारी येथे पोहचत मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

 

सदर कुटुंबियांची परिस्थिती हालाकीची आहे. त्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांची स्वतः भेट घेऊन केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर पिडीत कुटुंबियांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली. इतकी मोठी घटना घडुनही कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिलेली नाही. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी तहसीलदार यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधात नाराजी व्यक्त केली. सदर कुटुबांना प्रशासनाच्या वतीनेही मदत मिळावी याकरिता अधिका-र्यांनी प्रयत्न करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्यात. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी लावारी येथील मृतक प्रशांत नगराळे, कालु टिपले, महिपाल मरचापे, बाळकृष्ण तेलंग, साईनाथ कोडापे यांच्या कुटंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here