विवेक नगर येथील राम मंदिरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाआरती

0
655

विवेक नगर येथील राम मंदिरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाआरती

 

 

राम नवमी निमित्य विवेक नगर येथील राम मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सदर महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर कमेटी अध्यक्ष राम चोपडे, कार्यकारी अध्यक्ष डाॅ. श्याम कुंदोजवार, उपाध्यक्ष देवेंद्र मोगरे, सचिव रवि पिंपळशेंडे, सहसचिव अविनाश भट, भारती सोईतकर, कोष्याध्यक्ष रंजीव श्रीरामवार आदिंची उपस्थिती होती.

राम नवमी निमित्य शहरात विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनांमुळे शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. दरम्याण आज सकाळच्या सुमारास विवेक नगर राम मंदिर कमीटीच्या वतीने राममंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहत महाआरती केली. या प्रसंगी आ. जोरगेवार यांनी प्रभु राम यांच्या मुर्तीला पुष्प अर्पण करत पुजा अर्चना केली. तसेच चंद्रपूरकरांच्या सुढृळ आरोग्यासाठी कामना केली. यावेळी रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here