डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाची नागपूर पोलिसांचे विशेष तपासणी पथक चौकशी करणार

0
459

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाची नागपूर पोलिसांचे विशेष तपासणी पथक चौकशी करणार

राजु झाडे

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे – करजगी यांचा सोमवारी मृत्यू झाला. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतले असल्याची माहिती समोर आली.

त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केले.
परंतु त्यांनी स्वतःला नेमके कोणते इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती, याचा खुलासा होणे बाकी आहे.
या संपूर्ण प्रकरणाचेे गुपित उलघडण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष पथक नेमण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूरहुन विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
सध्या तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिक माहिती देणे शक्य असल्याची माहिती चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here