वेष बदलून पालकमंत्री बच्चू कडू पातुरात, गुटखा पकडला

0
636

वेष बदलून पालकमंत्री बच्चू कडू पातुरात, गुटखा पकडला

 

 

Impact 24 news

अकोला जिल्हा प्रतिनिधी/मुकेश हातोले

अकोला/पातुर: शहरात गत काही महीन्यांन पासून अवैध धंदे आणि गुटखा विक्री होत असल्याची तसेच तहसील कार्य ल्यात देवान-घेवान करून शिधापत्रीका वाटप तसेच राशन दुकानात काळाबाजार व बैंकेत पैसे घेऊन कर्ज वाटप होत असल्याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांना मिळाली होती.

आज अकोलाजिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी वेष बदलून मुस्लिम पठानी ड्रेस व टोपी घालून पातुरात एंट्री करून गुटखा पकडला. तसेच तहसील कार्यालय, बँकेत भेट दिल्याने एकच खळबळ उडाली होती. पालकमंत्र्यांनी पठानी ड्रेस व टोपी घातल्याने त्यांना कोणी ओळखले नाही. तहसील कार्यालय व बँकेत पालकमंत्री बच्चू कडू हयांना काहीच आढळून आले नाही. परंतु गुटखा पकडला आहे. सदर दुकान मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एकीकडे गुटखाबंदी सांगून दूसरीकडे संपूर्ण अकोला जिल्ह्यात, तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यानुसार आज मी पातुर मध्ये आलो या ठिकाणी चांगले वाईट अनुभव आले तर गुटखा विक्री होत असून अन्न औषधी प्रशासन विभाग मोठ्या प्रमाणात हप्ते घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here