विद्यार्थ्यांनी आत्मचरित्रांचे वाचन करावे – प्रा. डॉ. स्वानंद पुंड

0
451

विद्यार्थ्यांनी आत्मचरित्रांचे वाचन करावे – प्रा. डॉ. स्वानंद पुंड

लोकमान्य टिळक महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रम संपन्न

यवतमाळ/प्रतिनिधी : लोकमान्य टिळक महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजशास्त्र विभागाच्या वतीने ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे यांनी भूषवले व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा यांचा परिचय प्रा. डॉ. नीलिमा दवणे यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात. विद्यार्थ्यांनी काय वाचावे, कसे वाचावे व कोणत्या गोष्टीचे वाचन करू नये या सर्व गोष्टी विद्यार्थ्याने समजून घ्याव्यात. आणि विद्यार्थ्यांचे वाचन परीक्षेकरिता मर्यादित असू नये. तर त्यांचे वाचन हे त्यांच्या पुढील जीवनाचे उद्देश पूर्ण करण्याकरिता आहे. या उद्देशाने वाचन करावे.
विद्यार्थ्यांनी आत्मचरित्रांचे वाचन करावे कारण दुसऱ्यांच्या अनुभवातून आपलं जीवन समृद्ध करता येते. आणि महान तेजस्वी अशा पुरुषांचेच आत्मचरित्र लिहिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मचरित्रांचे वाचन करावे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. किशन घोगरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here