विहिरीत उडी घेऊन महिलेने संपविली जीवनयात्रा, चिंचोली (बु.) येथील घटना

0
707

विहिरीत उडी घेऊन महिलेने संपविली जीवनयात्रा, चिंचोली (बु.) येथील घटना

विरुर स्टे. (राजुरा) : तालुक्यातील चिंचोली (बु.) येथील महिलेने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. महिलेचे नाव पौर्णिमा मनोज आसुटकर (अंदाजे २२ वर्ष) असे असून सदर महिला गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार पोलीस ठाणे विरुर स्टेशन येथील चमुंनी घटनास्थळ गाठून महिलेचे शव विहिरी बाहेर काढले. उत्तरीय तपासणी शव पाठविले असून पुढील तपास विरुर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here