महिला पत्रकार शोभा जयपुरकरची तेली समाज महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या नागपूर शहर सचिव पदी नियुक्ती !

0
550

महिला पत्रकार शोभा जयपुरकरची तेली समाज महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या नागपूर शहर सचिव पदी नियुक्ती !

नागपूर 🛑🔷किरण घाटे🔷🛑

संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या नागपूर शहर सचिव पदी सुपरिचीत महिला पत्रकार तथा समाजाच्या सक्रिय कार्यकर्त्या शाेभा किशाेर जयपुरकर यांची सर्वांनुमते काल दि.२नाेव्हेंबरला नियुक्ती करण्यांत आल्याची माहिती उपरोक्त संस्थेचे संस्थापक अजय धाेपटे यांनी दिली .पत्रकारितेतील दांडगा अनुभव असणां-या शाेभा जयपुरकर यांनी आपल्या पत्रकारितेची ख-या अर्थाने सुरुवात दैनिक महासागर (नागपूर )येथुन केली त्या नंतर त्यांनी कलम का गाैरव हे वर्तमानपत्र आरंभ केले .🔷🛑🟠व्रूत्तपत्रिय लिखानासाेबतच त्यांना सामाजिक कार्यात विशेष रुची व गाेडी आहे .सुरुवातीचा काळ त्यांचेसाठी अतिशय संघर्षमय गेला .परंतु त्यांनी या सर्व संकटावर यशस्विरित्या मात केली .आज मला प्रत्यक्षात व ख-या अर्थाने समाजाची सेवा करण्यांची संधी मिळाली अश्या भावनात्मक शब्दात शाेभा जयपुरकर यांनी इम्पँक्ट २४च्या प्रतिनिधीशी बाेलतांना आपली प्रतिक्रिया दिली .🔷🛑🟠त्यांचे या नव नियुक्तिचे स्वागत व अभिनंदन अजय धाेपटे , संगिता तलमले , महेन्द्र भूरे , हितेश बावनकुळे , रुपेश तेलमासरे , गजानन तळवेकर , कविता रेवतकर , प्रतिभा खाेब्रागडे , चित्रा माकडे यांनी केले दरम्यान शाेभा जयपुरकर यांचे विदर्भस्तरांवरुन देखिल (समाज बांधवा कडुन)अभिनंदन हाेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here