अवैध दारुस्काराला अटक चिमूर पोलिसांची कारवाई

0
383

अवैध दारुस्काराला अटक

चिमूर पोलिसांची कारवाई

तालुका प्रतिनिधी
चिमूर.

अनेक दिवसांपासून चिमूर पोलीस दारूबंदीच्या कारवाही करीत आहेत परंतु अवैद्य दारूविक्रेते हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवैद्य दारू आणून विक्री करीत आहे अश्यावरही चिमूर पोलिसांनी दिवस रात्र एक करून लपून छपून कारवाही करून दारू विक्रेत्यांचे मुसके बांधले आहे. परंतु नवीन नवीन दारू विक्रीच्या व्यवसायात उतरलेले इसम हे पोलिसांच्या नजरेत न येता छुप्या मार्गावर चिमुरात दारू विक्री करिता आणून विक्री करीत आहे अश्याच एका छुप्या रुस्तमला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खाजगी वाहनाचा वापर करून मिळालेल्या माहितीवर पाडत ठेऊन असता एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी अस्तिलो झेन क्र MH 34 AM 4361 ही चिमुरकडे जाताना दिस्ताक्षणी तिचा पाठलाग केला असता गाडी चालकाने सदरची गाडी थांबवून अंधारात पळ काढला तेव्हा सदर गाडीची पाहणी केली असता गाडीचे आत विदेशी दारूचा मुद्देमाल असा एकूण 3,37,500 रु. चा मिळून आल्याने गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी श्यामराव कवडुजी मुरलेली उर्फ श्यामराव मुळे रा वडाळा पैकू चिमूर यास अटक करण्यात आली.
सदरची कारवाही मा उप विभागीय पोलीस अधिकारी चिमूर श्री अनुज तारे , पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे मार्गदर्शनात नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, सतीश झिलपे, विजय उपरे यांनी पार पाडली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here