जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या माध्यमातून शेतकरी कल्याण निधी चे पोंभुर्णा येथे वाटप

0
457

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या माध्यमातून शेतकरी कल्याण निधी चे पोंभुर्णा येथे वाटप

पोंभुर्णा प्रतिनिधी :-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ही बँक सामाजिक बांधिलकी जोपासत ‘शेतकरी कल्याण निधी’ निर्माण करून सहकारात्मक योजना राबवित आहे.जिल्ह्यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दुर्बल घटक, गरीब, गरजूंना कल्याण निधीतून आर्थिक मदत दिली जाते. याच निधी अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाची मदत करण्याची संकल्पना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक संजय तोटावार यांनी मांडली त्याचाच एक भाग म्हणून पोंभुर्णा येथे तालुक्यातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा छोटाखाणी कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती बँक पोंभुर्णाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या बाळु नैताम, सुधाकर रेगुलवार, पुरुषोत्तम वासेकर या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोंभुर्णाच्या शाखा व्यवस्थापक श्री बुग्गावार, ओमेश्वर पद्मगीरीवार, अशोक गेडाम, अमरसिंह बघेल, राकेश नैताम यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून धनादेश वाटप करण्यात आले. कोरोणा नियमांचे काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन पंकज मोरे यांनी तर आभारप्रदर्शन सुनिल कुंदोजवार यांनी केले शेतकऱ्यांना कठीण प्रसंगी कोणतीही मदत करण्याची तयारी शाखा व्यवस्थापक यांनी दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here