हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा आज निषेध मोर्चा.

0
624

हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा आज निषेध मोर्चा.

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करून आरक्षण देण्याची सुद्धा मागणी.

हिंगणघाट (वर्धा):-तालुका प्रतिनिधी -अनंता वायसे

पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करण्याबाबत तसेच ०२ ऑगस्ट २०१९ ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला तो रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक २८ जुलै २०२१ रोज बुधवारला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध मोर्चा हा संत तुकडोजी चौकापासून कारंजा चौक इंदिरा गांधी चौक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक होत तहसील कार्यालयावर धडकणार आहे व दरवाढ कमी करण्याबाबत निषेध प्रदर्शन करत निवेदन देण्यात येणार आहे.

मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून देशांमध्ये कोरूना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून सर्व देश वासी यामुळे आर्थिकदृष्ट्या भरून निघाले आहेत. अशातच केंद्र सरकार द्वारे वेळोवेळी पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ ही देशवासियांसाठी व शेतकरी यांच्यासाठी मोठी अन्यायकारक आहे.

सध्या शेतकरी,शेतमजूर ,कामगार, व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य लोकांचे अर्थचक्र पूर्णपणे बंद झालेले असून नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्यासमोर उपजीविकेसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. अशातच पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

०२ ऑगस्ट २०१९ ला राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला तो रद्द करण्यात यावा तसेच केंद्र व राज्य सरकारने स्वतंत्र आयोग नेमून ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्यावे

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाने प्रकरण कोर्टात असताना कोर्टाने केंद्र सरकारला ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती? असे विचारले होते. कोर्टाने सांगूनही भाजप सरकारने दुर्लक्ष करून आकडेवारी दिली नाही .त्यामुळे कोर्टाने १९३१ ची लोकसंख्या लक्षात घेता हा निकाल दिला. त्यामुळे ओबीसी समाजाला राजकीय व्यवस्थेपासून वंचित ठेवण्याचा भाजपचा हा डाव आहे. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला आहे.

या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगणघाट मतदार संघाच्या वतीने निषेध मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात येणार आहे. तरी मोर्चा मध्ये सर्व जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, नगरसेवक सौरभ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संजय तपासे तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, माजी नगरसेवक प्रल्हाद तेलंग, शहराध्यक्ष भूषण पिसे, समुद्रपूर नगरपंचायतचे गटनेता मधुकर कांमडी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गौरव घोडे, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर,रा.वि.काँचे अमोल त्रिपाठी, समुद्रपूर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सौरभ साळवे, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुनील ठाकरे, ओबीसी सेल समुद्रपूर तालुका अध्यक्ष श्याम थुटे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष शकील, उपाध्यक्ष फिरोज खान,सचिव विपुल थुल, सहसचिव नितीन नवरखेडे,हिंगणघाट रा.विचे शहराध्यक्ष राहुल कोळसे, हिंगणघाट, राष्ट्रवादी विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष नयन निखाडे, अशोक डगवार,प्रदिप डगवार, सय्यद नाजिर अली, धनराज टापरे ,राहुल लोहकरे, राजू ऊमरे आशिष अंड्रस्कर, निखिल वदनलवार, रा.काँ चे उपाध्यक्ष शरद कुलसंगे, शहर राहुल वानखेडे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष प्रवीण जनबंधू ,पंकज बचाटे, पदवीधर जिल्हाध्यक्ष मनोज बुरीले, हिंगणघाट तालुका अध्यक्ष अजय बुरीले, अल्पसंख्यांक महामंत्री मकसूद भावा, राजू भाईमारे, सचिन थुटे ,अमित अवचट, गोलू डफ ,युवराज माऊस्कर,पवन काकडे सोशल मीडियाचे वैभव मानकर, हर्षल तपासे, शाहरुख बक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक कांग्रेस, रा.विद्यार्थी काँग्रेस ,महिला काँग्रेस इत्यादी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here