स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त सांगोडा येथे पोलीस विभागाकडून बाईक रॅली चे आयोजन

0
438

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त सांगोडा येथे पोलीस विभागाकडून बाईक रॅली चे आयोजन

कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे व विविध गावातील पोलीस पाटील उपस्थित

 

नांदाफाटा : देशात सर्वत्र स्वतंत्र दिनाच्या 75 वर्षपूर्ती निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोठ्या धडाक्यात साजरा होत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियान देशातील कानाकोपऱ्यात, गावोगावी राबविण्यात येत आहे. याच अभियानात सहभागी होताना कोरपना पोलीस विभागाकडून परिसरातील विविध गावात हातात तिरंगा ध्वज घेत बाईक रॅली काढण्यात आली.

सांगोडा गावात पोलीस बांधवांकडून काढण्यात आलेल्या रॅली चे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, पोलीस पाटील संघनेचे अध्यक्ष पांडुरंग जरीले गावाच्या सरपंचा संजना बोंडे, उपसरपंचा ज्योती धोटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय कोल्हे, सांगोडयाचा पोलीस पाटील सुचिता पाचभाई, माजी सरपंच सचिन बोंडे, माजी सरपंच वामण मुसळे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा शेंडे, शिक्षक राजेश धांडे, रमेश टेकाम, शा.व्य.स. अध्यक्ष विकास अवताडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ धवस, विजय लांडे, बंडू भगत, ग्रापंचायत सदस्या सरीता देवाळकर, प्रियंका रागीट, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचभाई, माणिकराव देवाळकर, अनिल मोहीतकर, रविंद्र देवाळकर, महादेव हनुमंते, पुरुषोत्तम काळे उपस्थित होते.

याप्रसंगी कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ढाकणे यांचा संजना बोंडे सरपंच सागोडा यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी सरपंच वामण मुसळे व माजी सरपंच सचिन बोंडे, मुख्याध्यापिका शोभा शेंडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पाडूरंग जरीले यांचा सुचिता पाचभाई पो. पा. सांगोडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी उपस्थित समुदायाला हर घर तिरंगा अभियान व अमृत महोत्सव निमित्त मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन शिक्षक राजेश धांडे यानी केले. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक-युवती, महिला व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here