राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती कोरोणाच्या नियम पाळत आपल्या घरीच साजरी करा,धनगर समाज केळापुर तालुका अध्यक्ष सतीष होले यांचे आवाहन

0
473

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी/रवि गुरनुले

यवतमाळ/पांढरकवडा :- पांढरकवडा सध्या तालुक्यातच नवेतर महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोणाने कहर केले आहे, त्यामुळेच लाँकडाऊन टाळेबंदी शाशनाला करावी लागले आहे, दिवसे दिवस कोरोणा रुग्ण वाढत आहे, म्हणुन आपण आपल्या घरातच पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31मे ला 296 वी जयंती साजरी आपण आपल्या घरातच साजरी करावी असे आवाहन धनगर समाजाच्या केळापुर तालुका अध्यक्ष सतीष होले यांनी केले आहे, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर ह्या सकल धनगर समाजाची आराध्यदैवत आहे, त्यांच्या जयंती दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावायचे आहे, तसेच कोरोणा योध्दा पोलिस, डाँक्टर, व साफसफाई कर्मचारी महसुल कर्मचारी परिचारिका, यांचे अभिनंदन करुन स्वागत करायचे आहे, ज्यांना शक्य होईल त्यांनी मेंढपाळ बांधवाना मदत करुन लसीकरणाचे महत्व पटवुन द्यायचे आहेत तसेच मास्क, व सँनिटायझर चा उपयोग सर्वांनी करावा, सामाजीक अंतर ठेवावे व शाशनाला सहकार्य करावे असे धनगर समाजातील पू अहिल्यादेवी होळकर न्यायल ईन लढा प्रतिनिधि सतीष होले,गणेश काळे,प्रशांत गोहरकर,दिलिप झिले, नविन झिले, संदिप निपुले, राजु खंडाळकर, सुशील काळे यांनी केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here