वर्ग बारावीच्या निकालाबद्दल समाज माध्यमांमध्ये अफवांचा बाजार

0
881

वर्ग बारावीच्या  निकालाबद्दल समाज माध्यमांमध्ये अफवांचा बाजार  

       कोरपना .प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

नुकताच महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून वर्ग १० वी चा निकाल जाहीर झाला असून वर्ग १२ वीच्या निकालाबाबत ऑनलाईन काम कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकडून सुरू आहे.
शिक्षकांना वर्ग १२ वी चा निकाल अपलोड करण्याची व विविध प्रपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख २३ जुलै दिलेली होती.
परंतु सद्यस्थितीमध्ये पाऊस व पूर परिस्थिती तसेच नागपूर विभागीय मंडळाच्या सर्वर मधील बिघाड अशा विविध कारणांनी निकाल अपलोड करण्याची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. त्या नुसार निकाल अपलोड करण्याची मुदत एक दिवसानी वाढवून २४ जुलै करण्यात आली. परंतू २४ जुलै या तारखेला वर्ग १२ वी चा निकाल जाहीर होत असल्याबाबत समाज माध्यमां मध्ये उलट सुलट अफवा पसरविल्या जात आहे. त्या मुळे विद्यार्थांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे.
गड चांदुर येथील प्रतिष्ठित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख प्रा.जहीर सैय्यद यांना सदर निकाला बद्दल विचारपुस केली असता त्यांनी मंडळाने निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होण्याचा अंदाज वर्तविलेला आहे अशी माहिती दिली.
तसेच समाज माध्यमांमध्ये निकाला बाबत पसरविल्या जाणाऱ्या अफवांना विद्यार्थांनी बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here