बहूचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैसला रंगेहात पकडल्या नंतर आता चंद्रपूरचा सहायक नगर रचनाकार अनिल चहांदे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात !

0
720

चंद्रपूर.विशेष/किरण घाटे

 

चंद्रपूर :- जिल्ह्यातील महसूल विभागातील बहुचर्चित लाचखाेर तथा भद्रावती तालुक्यातील नंदाेरीचा मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांस दि.१एफ्रिलला एका फेरफार प्रकरणात चंद्रपूरच्या कास्तकारांकडुन दीड हजार रुपयांची लाच घेतांना भद्रावती तहसील कार्यालयात लालुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले हाेते .या बातमीचे विस्मरण हाेत नाही ताेच मे महिण्यांत चंद्रपूर येथील नगर रचना कार्यालयातील कार्यरत सहायक नगर रचनाकार अनिल चहांदे यास काल शुक्रवारला १०हजार रुपयांची ” ना हरकत ” प्रमाणपत्रा साठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी व त्यांचे पथकांनी सापळा रचून त्यास जाळ्यात अडकविले .भद्रावतीच्या एका शेतक-याने ही तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे नाेंदविली हाेती .त्या तक्रारीच्या आधारे हा सापळा रचण्यात आला हाेता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here