कुक्कडगांव येथे आरटीपिसिआर चाचणी

0
536

कुक्कडगांव येथे आरटीपिसिआर चाचणी 

राजेंद्र गायकवाड जालना प्रतिनिधी
जालना ः आज अंबड तालुक्यातील कुक्कडगांव येथे कोरोना ची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. व त्या मुळे मृतांची संख्या पण वाढताना दिसून येत आहे. याची खबरदारी म्हणून 29/05 रोजी सुखापूरी येथील बाजारचा दिवस पण कोविड महामारी मुळे सुखापूरी येथील काही भाजी विक्रेते आणि काही किराणा चे दुकाने कुक्कडगांव येथे भरवण्यात आला. या गर्दी मुळे कुक्कडगांव ग्रामपंचायत चे सरपंच सोनाली उद्धव गायकवाड, उपसरपंच संगिता तुळशीदास पटेकर व सदस्य यांनी विक्रेते यांच्या मुळे कुक्कडगांव येथील जनतेलाकोरोना संसर्ग ची लागण होऊ नये याची काळजी म्हणून आणि सर्वांची आणि गावातील काही जणांच्या आरटीपिसिआर टेस्ट करून घेतली या वेळी सुखापूरी आरोग्य केंद्रातील डॉ तोडकर, डॉ कळे ,आरोग्य सेविका ए.एस.जगधने, प्रतिभा कजबे आणि आशा सेविका कुंता संतोष डांगे व तसेच आंगणेवाडी मदतनीस संजीवनी वखरे, नंदाबाई रनपिसे यांनी गावातील लोकांच्या टेस्ट करून घेतल्या .यावेळी गावातील जनतेने प्रतिसाद दिला त्यामध्ये शिवाजीराव गायकवाड, सोपानराव गायकवाड,उद्धव गायकवाड,आन्नासाहेब पटेकर, तुळशीदास पटेकर,आणिल गव्हाणे, नवनाथ गायकवाड,किशोर गायकवाड, अंगणवाडी शिपाई संजवणी वखरे आदी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here