तोतया पत्रकाराने मागितली आपच्या जिल्हाध्यक्षांना खंडणी

0
582

तोतया पत्रकाराने मागितली आपच्या जिल्हाध्यक्षांना खंडणी

रामनगर पोलिसांनी केली दोघांना अटक

ईमानदार आम आदमी पार्टी ला बदनाम करन्याचे षडयंत्र कुणी करू नये.- सुनिल मुसळे

 

देशात आम आदमी पार्टी ईमानदार पार्टी म्हणून जनतेच्या विश्वासात उतरली आहे.आम आदमी पार्टीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन नवीन बदनाम करण्याच्या क्लुप्त्या लढविल्या जात आहे यातच चंद्रपुरात पहिल्यांदा आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्याला खंडणीची मागणी करण्यात आली.

आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांना फोन करून पत्रकार असल्याची बतावणी करीत तीस हजारांची खंडणी मागणाऱ्या तोतयाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

ऑक्टोबर महिन्यात आम आदमी पक्षाने सरकारी दवाखाण्यासमोरील श्री जी मेडिकल मध्ये 60 रुपयांची कटर ब्लेड 600 रुपयांना विकण्याची बाब उघडकीस आणत कारवाई करायला लावली होती. त्यानंतर 5 नोव्हेंबरला आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रहमान खान पठाण यांनी पक्षातील युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांची भेट घेत मेडिकल मालकाकडून 2 लाख रुपये घेतले, असा पुरावा एका पत्रकाराकडे आहे, असे सांगितले. आप च्या कार्यकर्त्याने इम्रान बाऊन्सर शेख व अशोक कुंड रा. भिवापूर वार्ड यांची प्रत्यक्ष भेट राईकवार यांच्यासोबत करून दिली.

आरोपींनी मयूर राईकवार यांना बातमी न लावण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर तुमचं सर्व राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल तुम्ही समाजात तोंड दाखविण्याच्या लायकीचे असणार नाही, अशी धमकी दिली.
तडजोडीअंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले. या सर्व प्रकरणाबाबत मयूर राईकवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

रामनगर पोलिसांनी सापळा रचत आरोपी 38 वर्षीय अशोक कुंड (रा. भिवापूर वार्ड) व 21 वर्षीय इम्रान उर्फ बाऊन्सर शेख (रा. पठाणपूरा गेट) यांना रंगेहात अटक करण्यात आली. भ्रष्टाचार विरोधात लढणारी पार्टी म्हणून आम आदमी पार्टी जनतेत लोकप्रिय झालेली आहे. आम आदमी पार्टीला षडयंत्र करून बदनाम करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

तसेच दोन लाख रुपये घेतल्याची खोटी माहिती कोणी सांगितली? तसेच सदरील प्रकरणात आरोपीच्या मागे कोण मास्टरमाईंड आहे याचा खुलासा पोलीस विभागाने करावा अशी मागणी आपतर्फे करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे व पोउपनी विनोद भुरले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here