हरिनामातून मानसिक समाधान सौख्य प्राप्त होते

174

हरिनामातून मानसिक समाधान सौख्य प्राप्त होते

सद्गुरू माणिक रोकडे महाराज; जैतापूर येथे कार्तिक एकादशी निमित्य कीर्तन महोत्सव

 

 

राजुरा : मागील २६ वर्षाची परंपरा जोपासत जैतापूर येथे कार्तिक एकादशी निमित्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी सद्गुरू माणिक महाराज यांनी उपस्थित भक्तांना प्रबोधित करताना सांगितले की, कार्तिकी एकादशीला ठिकठिकाणी भजन, कीर्तन, जागर, ईश्वरिंचतन करतात. त्यामुळे जनमानसांत सत्‌प्रवृत्तीचा, सद्भावनेचा, आशेचा भाव निर्माण होतो. पंढरीच्या दिशेने दिंड्याची ये-जा करणारे वारकरी भगवा झेंडा फडकवीत आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करीत रस्त्यांनी जातात. तेव्हा तर प्रत्यक्ष पांडुरंग अवतरल्याचा भास विठ्ठल भक्तांमध्ये होत असतो. प्रत्येक विठ्ठलभक्त, पूजाअर्चा, अभंग यातून विठ्ठलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. हरिनामातून झालेली विठ्ठलाची भक्ती आत्मसुख, नेत्रदीप देणारी तर असतेच पण मनाला कुठेतरी मानसिक समाधान सौख्य प्राप्त होत असते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात – कार्तिकीचा सोहळा। चला जाऊ पाहू डोळा।। आले वैकुंठा जवळ। सन्निध पंढरिये।। असे आपल्या कीर्तनातून भक्तांना बोधमृत पाजले.

दरवर्षी जैतापूर येथे नित्यनियमाने कार्तिकी एकादशीला दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जातात. यामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करून युवाकीर्तनकार ह. भ. प. दत्ता मसे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घेतला. दुसऱ्या दिवशी सद्गुरू नामदेव रोकडे महाराज यांची पालखी सोहळा बाहेर गावावरून आलेल्या भजन दिंड्यासह काढण्यात आली. त्यानंतर गोपाल काल्याचे कीर्तन सद्गुरू माणिक रोकडे महाराज यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी ह. भ. प. रामचंद्र गोहोकार, प्रशांत भोयर, अशोक साखरकर, यादव तुंबडे, देविदास साखरकर, सुभाष मसे, हेमंत तेजने, वसंता बोबडे, वैभव साटोने, वासुदेव बोरकुटे, सदानंद राऊत, भाऊराव चतुरकर, भुवन चौधरी, रामचंद्र झाडे, आनंदराव लांडे, गणपत झाडे, डॉ. किरमिरे, किसन काटवले काशिनाथ गोरे यांची उपस्थिती होती.

सद्गुरू नामदेव महाराज रोकडे यांचे अनुयायी चंद्रपूर, वर्धा सह तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील जैतापूर येथे मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे नागरिक कार्तिकी एकादशी निमित्य येतात, यामुळे जणू काही पंढरीच भरली असल्याचे चित्र दिसत होते. श्री गुरुदेव दत्त संप्रदायच्या सुरू होणाऱ्या कार्यक्रमाला जैतापूर येथून दरवर्षी सुरुवात होत असते. यानंतर सर्वत्र सद्गुरू नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रमाला सुरुवात असते.

यावेळी श्री गुरुदेव दत्त संप्रदाय जैतापूर येथील मनोहर धांडे, सुधाकर गोरे, पुरुषोत्तम गोनेवार, शहिंद्र मडावी, संतोष धांडे, सुनील खारकर, प्रवीण थेरे, प्रदीप गोरे, ज्ञानेश्वर बेरड, शंकर गोरे, सुनील आत्राम, विलास खारकर, वसंता थेरे, शोभा धांडे, मीराबाई खारकर, वंदनाताई बेरड, अनुसया उरकुंडे, शकुंतला थेरे, सदाशिव फोपरे, मुरलीधर थेरे, लटारी धांडे, पवन हनुमंते, सुधाताई धांडे, गीता ताजने, वर्षा गोरे, शालू लोनगाडगे, प्रेमीला खारकर, कांता धांडे, जयप्रकाश बेरड, दौलत धांडे, हरीचंद्र निब्रड, दिवाकर बेरड राजू चौधरी, विठ्ठल लोनगाडगे, मंगेश दुरटकर, यासह जैतापूर वासीयांनी सहकार्य केले.

advt