राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने दिला अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा, आमदार किशोर जोरगेवार यांचीही भेट

0
754
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने दिला अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा, आमदार किशोर जोरगेवार यांचीही भेट

रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष बंङू धोतरे यांच्याशी मागण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.

आज गुरुवारी (दि. २४) उपोषणाचा पाचवा दिवस होता. आजच्या साखळी उपोषणात नितीन बुरङकर, ललित मुल्लेवार, प्रमोद मलिक, धर्मेंद्र लूनावत, सुधीर देव यांनी सहभाग घेतला. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. इको प्रोने केलेल्या मागण्यांसंदर्भात पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी एक बैठक लावण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी दिले आहे.
दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे रामजीवन सिंग परमार, प्रभाकर मंत्री, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे रवींद्र येसेकर, नगरसेविका छबुताई वैरागडे, सचिन सारडा,  प्रशांत वैद्य, आजाद गार्डन मित्र मंडळाचे पदाधिकारी, चंद्रपूर सराफा असोसिएशनचे राजेंद्र लोढा, रोटरी क्लब चंद्रपूर, नंदू नागरकर, राजेंद्र गर्गेलवार, छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंङळाचे  अध्यक्ष दीपक बेले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप रामेङवार, वनवैभव ज्येष्ठ नागरिक मंडळाचे विजय चंदावार, चंद्रपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे गोपाल ऐकरे, विनोद बुद्धावार, राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेचे दीपक हिवरे, नरेंद्र सिडाम, प्रशांत बांबल, आर्य वैश्य स्नेह मंडळ अध्यक्ष अभय निलावार, अविनाश उत्तरवार, आर्य वैश्य युथ क्लबचे सारंग कासनगोटूवार यांनी पाठिंबा दिला.

रामाला तलावाच्या रक्षणार्थ चित्रकारांनी हाती घेतला कुंचला

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी चित्रकारांनी केली पेंटिंग

कुंचल्यातून व्यक्त केली रामाळा तलावाच्या प्रदूषणाची भीषणता

ऐतिहासीक गोंडकालीन रामाळातलाव प्रदूषण मुक्त व खोलीकरण करण्यासह इतर मागण्या घेऊन इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे रामाळा तलाव येथे अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील जिल्हा कलाध्यापक संघाच्यावतीने पेंटिंग काढण्यात आली. यातून त्यांनी जलप्रदूषण झाल्यास अशी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते याचे चित्रण केले.
गुरुवार दि.25/02/2021 ला सकाळी 7:30 वाजता कला शिक्षक दाखल झाले. तलावाच्या काठावर बसून त्यांनी जलप्रदूषण, पाण्याचे महत्व आणि शहराचा इतिहास आपल्या कुंचल्यातून अधोरेखित केला. रामाळा तलाव प्रदूषण मुक्त होवो, या करिता स्वइच्छेने पोस्टर निर्मिती करून सत्याग्रहास समर्थन दर्शविले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा कालाध्यापक संघ चंद्रपूरचे अध्यक्ष किरण पराते, सचिव कार्तिक नंदूरकर, विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन बारापात्रे, शहर अध्यक्ष योगेश पेंटेवार किरण कंत्रोजवार, देवा रामटेके , स्वामी साळवे, संजय अंडर्सकर, संजय सोनुने, शशिकांत वांढरे, सुहास दुधलकर, सुहास ताटकंटीवार तसेच इतर कलाशिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here