नाशिक पदवीधर ची विजयी माळ कुणाच्या गळ्यात…..

0
408

नाशिक पदवीधर ची विजयी माळ कुणाच्या गळ्यात…..

ज्ञानेश्वर गायकर पाटील संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघात, अत्यंत चुरशीचा सामना आज मतदान प्रक्रियेत दिसला. अनेकांनी या विजयाची गणिते एकतर्फी मांडली असली तरी ,प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसत होते . मतदार सुप्त होता .कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता ,मात्र स्मित हास्य करून मतदान प्रक्रिया पूर्ण करून कुठ ही न वाच्यता करत घरचा रस्ता धरत होता . एकाच वाहनांमधून आणलेले काही मतदार वेगवेगळी मते देऊन पुन्हा घरी जात होती, असे ही चित्र दिसले.
बिगर मतदार कार्यकर्ता यांची मोठी गर्दी संगमनेर , वगळता इतरत्र दिसत नव्हती . नगर जिल्ह्यात शिवसेना , राष्ट्रवादी , व तुरळक काँग्रेस पक्ष शुभांगी पाटील ह्या महा विकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराला साथ देत होते,तर तांबे यांची सव्यभू यंत्रणा स्वतःच्या जोरावर लढत होती.
एकूण २ लाख ६२ हजार ६७८ मतदार नोंदणी झाली होती . यात ९५९८४ ह्या महिला मतदार होत्या.तर पुरुष मतदार , २६२६७८ होते.अहमदनगर जिल्ह्यात १,१५,६३८ मतदारांची विक्रमी नोंदणी करण्यात आली होती यात सुमारे ३५७१५ महिला, तर ७९९२३ पुरुष मतदार होते.नाशिक मध्ये ६९,६५२ जळगाव मध्ये ३५०५८, धुळे मध्ये २३४१२, तर आदिवासी नंदुरबार मध्ये १८४१८ मतदारांनी नोंदणी की होती.
आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण नोंदणी पैकी ४९.२८% मतदारांनी सहभाग नोंदवला असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. यात नंदुरबार येथे ९३८५(४९.६१%), धुळे – ११८२२ (५० .५० टक्के) जळगाव १८०३३(५१.४४ टक्के) नाशिक ३१९३३ (४५ ८५%) तर अहमदनगर ५०.४० टक्के मतदान,५८२८३ मतदारांनी सहभाग नोंदवला . एकूण २,६२६७८ पैकी १,२९,४५६ म्हणजे ४९.२८% मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला असल्याचे समोर आले आहे, यात महिला मतदारांनी केवळ 40.58% तर पुरुष मतदार यांनी 53.27 टक्के मतदान केले आहे .
संगमनेर येथे भाजप कार्यकर्ते यांनी मतदाना कडे पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत होते .काही ठराविक कार्यकर्ते मतदान करून गेले ,पण त्यांची संख्या न गण्य होती .असेच चित्र पाच ही जिल्ह्यात दिसले . वरवर वाटणारी एकतर्फे निवडणूक मोठ्या प्रमाणात चुरशीची होणार आहे. नगर जिल्ह्यात पारनेर, अकोले, श्रीगोंदा, या ठिकाणी शुभांगी पाटील यांचे पारडे जड होते .तर उर्वरित तालुक्यात सत्यजित तांबे यांचे पारडे जड दिसले , साधारण जिल्ह्यात ते मोठे लीड घेऊ शकतात . हा लिडचा फरक शुभांगी पाटील नाशिक मध्ये कव्हर करतील , असा प्राथमिक अंदाज आहे . नाशिक जिल्ह्यात 45861 मतदारांनी नोंदणी केली होती, पैकी 31933 मतदारांनी सहभाग नोंदवला आहे . माळी उमेदवाराने , तांबे यांची किती मते या ठिकाणी घेतली याची नक्की आकडेवारी अद्याप हाती आली नाही , मात्र छगन भुजबळ , हिरे , आदींचे आयोजन नाशिक मध्ये सत्यजित तांबे यांचे लीड कमी करेल हे नक्की… जळगाव मध्ये 18033 मतदारांनी मते टाकली आहेत हे प्रमाण 51.44 % असून हे सर्व जिल्ह्यात दोन नंबरचे उचांकी मतदान आहे. या ठिकाणी शुभांगी पाटील यांच्या करिता सुप्त लाट होती , निर्णायक निकाल जळगाव करू शकतो . धुळे या ठिकाणी 50.50% म्हणजे म्हणजे सर्वात जास्त मतदान झाले आहे . 11822 एकूण मतदारांनी सहभाग नोंदवला आहे. नगर जिल्ह्यात तांबे यांना मिळणारी आघाडी या ठिकाणी “नुट्रल” होऊ शकते . अन् नंदुरबार ज्याला साथ देईल तो भविष्यातील पदवीधर आमदार होऊ शकतो. नंदुरबार ची ९३८५ मते खूप निर्णायक मते असणार आहेत . विजयी श्री कुणाला पाविली जावी या बद्दल मतदारांचे फार उत्सुकता नाही .सुप्त मतदान जॉइंट किलर ही होऊ शकते … पण वाट पाहावी लागेल २ feb २०२३ …. विजयी कुणी ही असेल , पण एक नंबर मतदान प्रक्रिया नसेल , दोन नंबरची मते मोजावी लागतीलच… कदाचित प्रेफरन्स तीन पण ….
dmgaykar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here