विद्यालयाची मान्यता रद्द करा अन्यथा धरणे आंदोलन करणार – प्रहार तर्फे सुरजभाऊ ठाकरे यांचा ईशारा

0
497

विद्यालयाची मान्यता रद्द करा अन्यथा धरणे आंदोलन करणार – प्रहार तर्फे सुरजभाऊ ठाकरे यांचा ईशारा

विद्यालयाचा फी भरण्यास पालकांवर सातत्याने दबाव टाकण्याचे प्रकरण उजेडात

अमोल राऊत, 21 ऑगष्ट

प्रहार जनशक्ती पक्ष शहर चंद्रपूर तर्फे सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील नारायणा विद्यालयात लॉकडाउनच्या काळात शाळेच्या फी बाबत शासनाचे कुठलेही स्पष्ट निर्देश नसतानाही जवळपास सहाशे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पालकांना फी भरण्यास सातत्याने दबाव टाकत असल्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करावी. अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज शिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे देण्यात आले.
चंद्रपूर येथील नारायणा विद्यालयात लॉकडाउन काळातील मागील 4 महिन्याची फी भरली नसल्याने जवळपास 600 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून सातत्याने पालकांवर दबाव टाकण्यात येत आहे. देशभरात सुरू असलेल्या कोरोना संक्रमनामुळे मागील सत्रातील अनेक शाळांच्या परीक्षा पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. लॉकडाउन काळातील शासकीय नियमांमुळे अजूनही शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी शाळांनी पालकांकडून पैसे उकळण्यासाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या गोंडस नावाखाली ऑनलाईन शिक्षण सुरू केले असून ह्यात चंद्रपूर येथील नारायणा विद्यालय आघाडीवर आहे. ऑनलाईन क्लासेसची परवानगी व शाळेच्या फी बाबत शासनाचे कोणतेही स्पष्ट निर्देश नसताना देखील ऑनलाईन क्लासेस च्या नावाखाली शाळेची फी भरण्याकरिता पालकांवर दबाव टाकून हे विद्यालय विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असलेला घृणास्पद प्रकार समोर आला असून या विद्यालयाचे नाव मोठे व दर्शन खोटे हे स्पष्ट निदर्शनास आले आहे. यामुळे सदर विद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या पालकांसह नारायणा विद्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष शहर चंद्रपूर तर्फे सुरजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रहार सेवक राहुल चव्हाण, महेश हजारे, मुकेश मेहता, दयानंद नागरकर, अनिकेत उराडे, शुभम विलंगे, सुनील चव्हाण, रितिक बिसेन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here