मोहाळ्याच्या महिलांचा अवैध दारु विक्री विरोधात एल्गार

0
470

मोहाळ्याच्या महिलांचा अवैध दारु विक्री विरोधात एल्गार

अवैध दारू विक्रेत्यांची महिलांना धमकी

दारुविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

पोंभुर्णा :- तालुक्यातील मोहाळा येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री गावालगतच्या शेतात चालू होती. मोहाळा येथील “दुर्गा” महिला बचत गटांच्या महिलांना याची माहिती मिळाली असता बचत गटांच्या महिलांनी शेतात जाऊन त्यांची दारु पकडुन दिली. मोहाळा येथील तिन दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आले.जमानतीवर बाहेर येताच दारू विक्रेत्यांनी दुर्गा महिला बचत गटाच्या महिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे सुरू केले. यामुळे दुर्गा महिला बचत गटाच्या महिलांनी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन गुंड प्रवृत्तीच्या दारुविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी उमरी येथे महिलांनी पोलिस ठाण्यात एल्गार पुकारला होता ती घटना ताजी असताना मोहाळा येथील दारुविक्रेत्यांनी गावातील महिलांना मारण्याची धमकी देणाऱ्या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अवैध दारू विक्रीने दोन नंबरचा पैसा कमावणारे दारुविक्रेत्यांचे मनसुबे वाढले असल्याने यावर पोलिस प्रशासनाकडून कोणती कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here