ब्रेकिंग! हृदयद्रावक घटना… भरधाव पिकअपने तीन चिमुकल्यांना चिरडले, एक ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक

0
630

ब्रेकिंग! हृदयद्रावक घटना…

भरधाव पिकअपने तीन चिमुकल्यांना चिरडले, एक ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक

गोंडपीपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील घटना

गोंडपीपरी : तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे पिकअप चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहनाच्या खाली येऊन तीन चिमुकले गंभीर जखमी झाले. दवाखाण्यात नेताना 7 वर्षीय चिमुकली दगावली. तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना 9:30 वाजेच्या सुमारास घडली. आष्टी कडून गोंडपीपरी कडे येणाऱ्या भरधाव पिकअप चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ही हृदयद्रावक घटना घडली.
यात वाहनाचाही पुढील भाग दुरघटनाग्रस्त झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या आवारात लहान चिमुकले खेळत होती. या मुलावर पिकअप (एमएच ३३ जी ०५६०) घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढली. यात अलेशा पंढरी मेश्राम (७ वर्षे), अस्मित बंडू मेश्राम (१०) रा. नवेगाव वाघाडे, माही बंडू रामटेके (१२) रा. चंद्रपूर या तीन चिमुकल्यांना गंभीर दुखापत झाली. अलेशाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असतांना तिचा जीव गेला. तर माही आपल्या आजोळी आली होती. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन चालकास अटक केली असून जखमी मुलांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here