खड्या मुळे गडचंदुरातील जनतेचे बे हाल

0
296

खड्या मुळे गडचंदुरातील जनतेचे बे हाल

गडचांदूरातील मुख्यरस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही दयनीय.
खड्डे व धुळीमुळे नागरिक हैराण. अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी.
गडचांदूर/प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर शहराची शान समजला जाणारा मुख्य रस्त्याचे गेल्या काही वर्षांपूर्वीच दुभाज व डांबरीकरण करण्यात आले.अल्पावधीतच यावर जागोजागी भेगा व खड्डे पडायला सुरुवात झाली.करोडोंच्या खर्चाने निर्मित सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड आजतागायत ऐकायला मिळत आहे.तेलंगाणा राज्याकडे जाणारा सदर राष्ट्रीय महामार्ग गडचांदूर शहरातून जातो.24 तास याठिकाणी शेकडो लहानमोठ्या वाहनांची वर्दळ असते.गेल्या एक महिन्यापासून सदर रस्ता दोन्ही बाजूला खोदून गीट्टी व माती टाकण्यात आली.यानंतर डांबरीकरण होणार होते.मात्र सध्या हे काम बंद असून अर्धवट अवस्थेत पडून आहे.सदर रस्ता पूर्वीपेक्षाही खराब झाल्याचे चित्र असून गीट्टी पसरल्याने ये-जा करणाऱ्या बाईकस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.मोठमोठ्या वाहनांच्या रात्रंदिवस वाहतुकीमुळे उडणारी धुळ लगतच्या दुकानदारांना अक्षरशः त्रासदायक ठरत आहे.सदर रस्त्यावर पसरलेली गीट्टी, पडलेले खड्डे आणि धुळीमुळे निष्पाप नागरिकांचे जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.शहराची शान समजल्या जाणार्‍या सदर रस्त्याकडे संबंधीत विभागाने त्वरित लक्ष देऊन अर्धवट पडलेल्या कामाला पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वजा विनंती गडचांदूर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष सुनील चिंतलवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here