महाकाली मंदिर परिसरातील वार्डात भर पावसाळ्यातही नळांना पाणी नाही! नपचे मनपात रुपांतर झाल्यानंतरही परिस्थितीत बदल नाही?

0
502

महाकाली मंदिर परिसरातील वार्डात भर पावसाळ्यातही नळांना पाणी नाही! नपचे मनपात रुपांतर झाल्यानंतरही परिस्थितीत बदल नाही?

चंद्रपूर, किरण घाटे वि.प्र. – चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर वार्ड येथील महाकाली नगर झोपडपट्टी येथे भर- पावसाळ्यात तीव्र-पाणी टंचाई असल्यामुळे येथील सर्व सामान्य नागरिकांना घरगुती नळ- कनेक्शन असतांना सुद्धा पाण्यासाठी दारो-दार फिरावे लागत असल्याचे चित्र सध्या द्रूष्टीक्षेपात पडत आहे.
चंद्रपूर शहर मनपा पाणी पुरवठा विभागाकडून रात्रौला 3 वाजता पाण्याचे नळ सोडले जात आहे .त्यामुळे नागरिकांची झोप-मोड होत आहे. त्यांचे आरोग्यांवर विपरीत परिणाम होण्यांची शक्यता नाकारता येत नाही . स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते- सुधाकर कातकर यांच्या नेतृत्वात दि. 29 जुन 2021 ला मनपा आयुक्तांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले होते. आयुक्तांच्या आदेशाच्या अनुषंगाने दि. 02 जुलै 2021 ला चंद्रपूर शहर मनपा पुरवठा विभागांचे कर्मचारी चौकशीला आले. चौकशीसाठी त्यांनी पहिल्यांदा दुपारी नळांना पाणी पुरवठा केला असता 98 टक्के नळांना पाणी आले होते.
रविवार दिनांक- 04 जुलै 2021 ला पुन्हा रात्री 3 वाजता नळ सोडण्यात आले. नळांना खरंच पाणी येते ” कीं ” नाही याची प्रत्यक्ष घटना स्थळावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते- सुधाकर कातकर यांनी रात्रौ 3 वाजता झोपडपट्टीस भेट देऊन घर निहाय पाहणी केली असता, काही नळांना पाणी आलेच नाही. काही नळांना फार कमी तर काही नळांना अपुरा पाणी पुरवठा झाल्याचे या वेळी दिसून आले.
दरम्यान या वेळी या भागातील 18 नळ कनेकशनची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली तेव्हा सुलोचना शेंडे, पुष्पा निमगडे, उमा दुर्गे, पूजा हेडाऊ, सुनीता सोनकुसरे, सुलोचना मोहुर्ले, अभिषेक मेश्राम आणि इत्तर महिला व पुरुष हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here