कोरपना नगरपंचायत निवडणूक बाहेरच्या मतदारांनी फिरवली पाठ

0
607

कोरपना नगरपंचायत निवडणूक बाहेरच्या मतदारांनी फिरवली पाठ

 

नितेश शेंडे, प्रतिनीधी
नांदाफाटा: तेलंगणा राज्य सिमेवर चंद्रपुर जिल्ह्याच्या टोकेवर असलेल्या कोरपना नगरपंचायतच्या व्दितीय निवडणूक पहिल्या टप्प्यात १४ प्रभागाची निवडणूक २१ डिसेंबरला पार पडली. त्यामध्ये उमेदवाराचे नशीब पेटिबंद झाले तर ३ प्रभागातील इतर मागास प्रवर्गातील जागेमुळे निवडणुका न्यायालयाच्या हस्तक्षेपाने थांबल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार नव्याने कार्यक्रम घोषीत होवुन ३ प्रभागातील उमेदवार आपले नशीब आजमविण्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. कोरपना नगरपंचायतीच्या एक हाती सत्तेला काँग्रेस विरोधात भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना यांनी परिवर्तन आघाडी तयार करून ३० वर्षापासुन सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला तगडे आव्हान देवुन वातावरण परिवर्तनाच्या दिशेने वेगाने वाहु लागल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. कोरपना नगरपंचायतीमध्ये अनेक बाहेरच्या बोगस मतदारांच्या भरोशावर गेल्या ३ दशकापासून सत्तेमध्ये बाजी मारण्यास यशस्वी झाले. मात्र विरोधी पक्षाने बोगस मतदारांचा पाटलाग करुन निवडणुकीपुर्वी बोगस मतदारांचे आक्षेप सादर करून निवडणूक निर्णय अधिका-यांनी बाद ठरविले. तसेच ५०० पेक्षा अधिक नाव बोगस असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात पिटिशन दाखल करून नाव वगळण्याची मागणी व पुराव्यानिशी आक्षेप दाखल केला होता. मात्र निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने हिंगणघाट, वर्धा, नागपुर, गडचांदुर, राजुरा, चंद्रपुर अश्या अनेक ठिकाणी मतदार असतांना नगरपंचायतीच्या निवडणुकी पुरत कोरपन्याला मतदान करून सत्ताधा-यांचे पारडे जड केल्या जात असे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या १४ प्रभागातील निवडणुकीमध्ये ४१६ मतदारांनी भाग न घेता मतदानापासून पाठ फिरवली तर गावामध्ये बाहेरचे मतदार व बोगस मतदाराबद्दल गावामध्ये तीव्र असंतोष भडकुन तणाव व दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे बाहेरच्या मतदारांनी मतदानापासुन दुर राहणेच पसंत केले. त्यामुळे ३ प्रभागात देखिल याचे पडसाद उमटत असल्याने होणा-या निवडणुकीत देखिल बाहेरच्या मतदारामुळे तणाव निर्माण होण्याची परिस्थिती असल्यामुळे यापूर्वी कोरा, ता. हिंगणघाट येथिल ग्रामपंचायत सदस्य पंढरे हे असतांना कोरपन्यात मतदार कसे ? यावरुन अनेक पत्रकबाजी व प्रसिध्दी झाल्याने अनेक सुज्ञ मतदारांनी सावध पवित्रा घेत कोरपना नगरपंचायत मतदार यादितून नाव वगळण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची नामुश्की अनेक मतदारावर ओढावली मात्र ती नावे १ जानेवारी विधानसभा मतदार यादीत कमी होणार असल्याने नगरपंचायत प्रसिध्द झालेल्या यादित त्यांचे नावे कायम असल्यामुळे स्थानिकामध्ये बोगस मतदाराबद्दल चिड आहे. यावेळी ओबीसी समाज, मुस्लिम समाज तसेच तेली समाजामध्ये फुट पडल्यामुळे सत्ताधारी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का असल्याचे मानल्या जात आहे. परिवर्तन आघाडीने सुशिक्षित, तरुण, पदविधर उमेदवार रिंगणात उतरवुन काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच नगरपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार, घनकचरा मजुराचे शोषण, नळ योजनेचा अभाव, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शमशान भुमीची असुविधा, कब्रस्तान, अर्धवट पडलेली रस्ते यामुळे सत्ताधा-यांना धारेवर मतदारांनी धरल्यामुळे दोन्ही पक्षाकडून आरोपाच्या फे-या झडल्या. मात्र यावेळी तयार झालेले वातावरण परिवर्तनाच्या दिशेने असल्याने परिवर्तन आघाडीची सत्ता येईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबीद अली यांनी केला असून ३० वर्षानंतर परिवर्तन घडेल असे मत व्यक्त केले आहे.मात्र आता मतदार कोनाचे पारडे अवजड करनार हे येणारी 19 तारीखच सांगनार आहे. याकडे संपूर्ण तालुका आस लावून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here