गडचिराेलीच्या मनीषा मडावी लवकरचं छाेट्या पडद्यावर झळकणार !
🟡🟣गडचिराेली🟢किरण घाटे🟡 विदर्भातील गडचिराेली जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असणां-या तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या लवकरचं छाेट्या पडद्यावर झळकणार असुन एका टीव्ही मालिकेसाठी मनीषा मडावीची निवड झाली आहे . नक्षल प्रभावित क्षेत्रातुन महाराष्ट्र सुपर मॉडेल टीव्ही रिऍलिटीशो पर्यंत पोहचविण्यांत ग्रोथ प्रोडँक्शन आणि साई काळे यांचे फार माेलाचे योगदान असल्याची प्रतिक्रिया पुण्यावरुन स्वगावी (गडचिराेली ) पाेहचल्यानंतर मनीषा मडावीने या प्रतिनिधी साेबत आज भ्रमणध्वनी बाेलतांना व्यक्त केली . माझ्या सारख्या तळागळातील वास्तव्याला असणाऱ्या साठी टीव्हीवर येण्याची एक सुवर्ण संधी ग्राेथ प्राेडक्शन व साई काळे यांनी उपलब्ध करून दिली असल्याचे मडावी म्हणाल्या. आगामी एका टीव्ही मालिकेत मी झळकणार असल्यामुळे माझ्या आदिवासी समाजाचं आणि आदिवासी जिल्ह्याचे नांव निश्चितंच महाराष्ट्रातील घरा घरात पाेहचणार आहे असे ही मडावी पुढे म्हणाल्या ! विशेष उल्लेखनीय बाब अशी की विविध स्पर्धेत मनीषा मडावीने अनेक पारिताेषीके व विशेष सन्मानपत्रे प्राप्त केली आहे . सामाजिक कार्यातही आज पावेताे त्यांचे योगदान माेलाचे राहिले आहे .
