राष्ट्रसंताचा सुधारणावादी विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

0
314

राष्ट्रसंताचा सुधारणावादी विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

घुग्घुस येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यस्मरण व सर्व संत स्मृतिप्रीत्यर्थ जाहीर प्रवचन, महिला मेळावा व राष्ट्रीय किर्तनाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न


घुग्घुस : येथील बहुउद्देशीय वारकरी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यस्मरण तथा सर्व संत स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रवचन, महिला मेळावा व राष्ट्रीय किर्तनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचा सोहळा आज रविवार, २९ जानेवारीला स्थानिक प्रयास सभागृहात थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ह.भ.प. नीळकंठ हळदे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, साजन गोहने आदि मंडळी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना, आपल्या महाराष्ट्राला संत-महात्म्यांची थोर आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. संतांनी सांगितलेल्या सुधारणावादी विचारांना अंमलात आणून समाजहीत जोपासण्याबरोबरच राष्ट्रकल्याण साधायची आज वेळ आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजेरी भजन, किर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजात प्रबोधन करून मानसाच्या उन्नतीसाठी दिशा देण्याचं कार्य केलं. संतांच्या शिकवणीमुळेच आज समाजात एकोपा, आध्यात्मिक व सामाजिक बांधिलकी टिकून आहे.

आदर्श समाजाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गाव व्हावया निरोगी सुंदर। सुधारावे लागेल एकेक घर। त्याआधी घरात राहणार। करावा लागेल आदर्श।। या सुधारणावादी विचाराला समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

प्रथम सत्रात सकाळी ५:३० वाजता ह.भ.प. निळकंठ हळदे महाराज (गुरुकुंज मोझरी) यांच्या शुभ हस्ते घटस्थापना व सामुदायिक ध्यानपाठ, ७ ते ८ वाजता पतंजली योग समितीद्वारे योगासन, ९ ते १२ वाजता ग्रंथदिंडी, पालखी, शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी यांचेसह मोठ्या संख्येने घुग्घुस वासीय बंधूभगिनी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिवरकर, सचिव सुरेश ढवस, संघटक जयंता जोगी व सर्व सदस्यगण अथक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here