स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू लाभार्थ्यांना रेनकोट, ब्लॅंकेट व शिधापत्रिकेचे वितरण

0
515

स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू लाभार्थ्यांना रेनकोट, ब्लॅंकेट व शिधापत्रिकेचे वितरण

 

 

घुग्घुसचे माजी ग्रामपंचायत सदस्य, भाजपाचे व घुग्घुस शहराचे लोकप्रिय नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी १८ जून रोजी येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात श्री. देवरावदादा भोंगळे मित्र परिवारातर्फे गरजू, लाभार्थ्यांना रेनकोट, ब्लॅंकेट व शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.

 

याप्रसंगी स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.

 

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे हे आपल्या संवेदना व्यक्त करतांना म्हणाले की घुग्घुस शहराचे लोकप्रिय नेते स्व. पुंडलिक उरकुडे हे गोर गरिबांच्या मदतीसाठी नेहमी धावून जात होते व मदत करित होते. त्यांच्या अल्पावधित निघून जाण्याने भाजपाची मोठी हानी झाली. रुग्णांना, निराधारांना मदत, शिधापत्रिकेचे काम असो असे अनेक सेवाभावाचे काम स्व. पुंडलिक उरकुडे यांनी केले. शासनाच्या अनेक योजना गोर गरीब नागरिकांपर्यंत पोहचविल्या, या सेवा कार्याच्या माध्यमातून मी त्यांना अभिवादन करतो असे सांगितले.

 

 

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, श्रीमती निशाताई उरकुडे, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, कामगार नेते जियाउल्ला खान, सुरेंद्र जोगी, श्रीकांत सावे, नितीन काळे, बबलू सातपुते, राकेश भेदोळकर, धनराज पारखी, मोमीन शेख, मंदेश्वर पेंदोर, सुशील डांगे, मधुकर धांडे, महेश नागपुरे, वैभव निखाडे, स्वप्नील हनुमंते, छोटेलाल वर्मा, प्रकाश संभालपुरे, किशोर ठाकरे, गजानन कामतवार, रमेश खोबरे, प्रिया नागपुरे, पूजा नागपुरे, अनुसया चव्हाण, रेखा चव्हाण, सुनंदाताई लिहीतकर, शीतल कामतवार, नेहा कुम्मरवार, भारती परते, दुर्गा साहू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here