माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार व प्राचार्य पोटदुखे यांच्याकडून आदर्श आचार संहिता नियमांचे उल्लघन

0
73

माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार व प्राचार्य पोटदुखे यांच्याकडून आदर्श आचार संहिता नियमांचे उल्लघन

संबंधित आयोजक समिती वर गुन्हा दाखल करून कार्यवाहीची मागणी

 

चंद्रपूर, दिनांक 4 एप्रिल 2024 – चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी एका गंभीर तक्रारीची नोंद केली आहे. या तक्रारीनुसार, राजीव गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथे दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी भारतीय जनता पक्ष आणि इतर NDA घटक पक्षांच्या लोकसभा उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे नोटीस संबंधित महाविद्यालयाने काढले आहे.

या नोटीसमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. तक्रारीत असेही म्हटले आहे की, फक्त एक दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या डॉ. विजय आईंचवार यांनी आपली राजकीय करिअर साधण्याच्या हेतूने पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करण्याची संधी देण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, शासकीय निधी प्राप्त केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये निवडणुकीच्या काळात राजकीय कार्यक्रम आयोजित करणे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे या बैठकीच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची पवित्रता राखण्यासाठी आचारसंहितेचे कडक पालन करणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

तक्रार खालील प्रकारे
तक्रार अर्ज
मा. जिल्हाधिकारी सा. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय,
चंद्रपूर
मा. मुख्य निवडणूक अधिकारी सा.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक अधिकारी

तक्रारदार :- मयूर राईकवार रा. जनता कॉलेज समोर नागपुर रोड चंद्रपुर.

विषय :- बी जे पी व इतर NDA घटक दल उम्मीदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे दिनांक 5/4/2024.रोजी राजीव गांधी इंजिनिअरिंग महाविद्यालय चंद्रपूर (RCERT) शासन निधी मान्य महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीत घेण्यात येणारा बैठकी विषयी दाखल घेऊन आदर्श आचार संहिताचे नियमांचे उल्लघन झाल्या बाबत संबंधित आयोजक समिती वर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्या बाबत

महोदय,
साविनय तक्रार या प्रमाणे आहे कि, वरील विषयांकित कारणा साठी सदरचा तक्रार अर्ज सादर करण्यात येत आहे. दिनांक 05-04-2024 रोजी दुपारी 02:00 वाजता छोटू भाई पटेल ऑडीटोरियम RCERT चंद्रपूर येथील महाविद्यालय मध्ये क्रीडा सप्ताह “ तरंग 2024” या शिर्षाखा खाली कार्यक्रम आयोजित करण्यात आली असून सदर कार्यक्रमाचा नोटीस संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे यांनी जारी केले असून सदर कार्यक्रमात नुकतेच BJP पक्षात प्रवेश घेतलेले माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, अध्यक्ष SPMS ट्रस्ट तसेच बी जे पी व इतर NDA घटक लोकसभा दल उम्मीदवार श्री.सुधीर मुनगंटीवार यानी सदर कार्यक्रमात विध्यार्थ्यांना संबोधित करणार आहे.
सदर महाविद्यालय UGC, महाराष्ट्र शासन व इतर शासकीय यंत्रणे मार्फत अनुदान व निधी संकलन करत असते या व्यतिरिक्त सदर महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद व शिक्षकांना सुद्धा सरकार कडून वेतन मिळते अश्या स्तिथीत सदर महाविद्यालय निवडणुकीचा वेळी प्रचार करीता वापरता येत नाही
या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत संबंधित महाविद्यालयाचे कर्मचारी वृंद तसेच शिक्षकांना निवडणूक कर्तव्या साठी सुद्धा नियुक्त करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

भारतीय लोकतंत्र मध्ये निवडणूक हा मोठा समारंभ व देशातील सामान्य नागरिकांचे मताचे आधारे आपल्या प्रतिनिधीना निष्पक्ष व आदर्श आचार संहितेचा कठोरतेने पालन करूनच निवडणुकीत सहभाग होण्याचा तसेच निवडणूक आयोगाचा परम कर्तव्य असतो परंतु संबंधित उम्मेद्वार व त्यांची निवडणूक पद्धत नियमबाह्य दिसून येत आहेत.
शासना कडून अनुदान प्राप्त महाविद्यालय, शिक्षण संस्थान तसेच इतर संस्थेत कोणतेही प्रचार कार्यक्रम किंवा निवडणुकीचा दर्मियान बैठक घेता येत नसताना बी जे पी व इतर NDA घटक दल उम्मीदवार याची बैठक नियमबाह्य रीत्या आयोजित करण्यात येत आहे करीता संबंधित आयोजक समिती तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे अध्यक्ष विरुद्ध आदर्श आचार संहिता चे उल्लंघन बाबत कार्यवाही करण्यास सदरचा अर्ज कार्यवाहीस सादर करत आहेत

स्थळ :- चंद्रपूर
दिनांक:- 4/4/2024 तक्रारदार मयूर राईकवार- जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी,जिल्हा चंद्रपुर

प्रतिलिपी
मुख्य चुनाव आयुक्त, महाराष्ट्र शासन, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here