भौतिक सुविधांमुळे विद्यार्थी विकास शक्य        

0
477

 ग्रामपंचायत संगणापूर येथील नविन शाळा इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन कविता भगत जी.प.सदस्य यांचे हस्ते पार पडले

 

भुमिपुजन सोहळ्यात शाळेतील कार्यरत शिक्षक व ग्रामसेवक मात्र चक्क गैरहजर

 

प्रतिनिधी/ सुखसागर झाडे

गडचिरोली/चामोर्शी :- शाळा हे औपचारिक शिक्षणाचे केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत भौतिक सुविधा असते गरजेचे आहे. यातून शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास शक्य आहे . असे मत मौजा सगणापुर येथील शाळेच्या नविन इमारत बांधकाम भुमिपुजन सोहळ्यात त्या व्यक्त करीत होत्या.ग्रामपंचायत संगणापूर येथील गावकऱ्यांनी गावातील शाळेची इमारत जीर्ण झालेली असून एका इमारतीची अतिशय आवश्यकता असल्याचे जी प सद्स यांना मागणी केली असता,जी.प.सद्स यांनी तात्काळ पाठपुरावा करीत जिल्हा परिषद मधून शाळा इमारत मंजूर करून आज रीतसर भूमिपूजन केले ।यावेळी सरपंच पार्वता कन्नाके।उपसरपंच रेवती पोरटे।सद्स धनराज सेलोटे।शाळा व्यवस्थापन सभापती व गावकरी उपस्थित होते.

मात्र यावेळी पुर्वसुचना देऊन सुध्दा ग्रामसेवक व शिक्षक गैरहजर होते. सदर ग्रामसेवक व शिक्षक हे मुख्यालय राहत नसून ते सदर ठिकाणी वारंवार गैरहजर राहत असल्याचे गावातील नागरिकांनी मत व्यक्त करीत याबाबत गावकऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली. यावेळी तात्काळ पं.स.चामोर्शीचे बिडिओ साहेब व शिक्षण अधिकारी यांचेशी चर्चा करून सदर माहिती दिली. संबंधित ग्रामसेवक व शिक्षक मुख्यालय न राहता कार्यरत ठिकाणी वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना रीतसर तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here