युवा लॉयन्स ग्रुप शेंदोळा बू. ची अपघातग्रस्ताला तात्काळ मदत

0
480

जिल्हा प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे

अमरावती/तिवसा  :-  रात्री 9 वाजता च्या सुमारास शेंदोळा बू ते पिंपळविहिर रस्त्यावर डीगरगव्हण येथील रहिवासी जितेंद्र ढोके नामक व्यक्तीचा भीषण अपघात झाला . अपघाताची माहिती मिळताच युवा लॉयन्स ग्रुप शेंदोला बू ची संपूर्ण टीम घटना स्थळी तात्काळ पोहोचली तेव्हा सदर युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कळेवर पडलेला होता.

तेव्हा त्याच्या घरच्यांना माहिती देऊन लगेच अंबुलन्स बोलावून जखमी युवकाला इर्विन दवाखान्यात पाठवण्यात आले.

यावेळी घटनस्थळवर युवा लॉयन्स ग्रुप चे प्रदेश महासचिव नितीन मोहिते, सचिन पवार, छत्रपती इंगोले,आकाश मोहिते,अतुल उमक, सूर्या उके,चेतन धस्कट,राहुल मोहिते,तेजस धस्कट,जीवन गायकवाड,सुरज मोहिते,गजानन वाघाडे,आदित्य मोहिते, अनिश पवार,विनोद पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here