महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत करीत छाेट्या अनोखी परीने केला आपला वाढदिवस साजरा

0
640

महिला रुग्णालयात स्त्री जन्माचे स्वागत करीत छाेट्या अनोखी परीने केला आपला वाढदिवस साजरा

उस्मानाबाद (मराठवाडा) किरण घाटे विशेष प्रतिनिधी : एरव्ही वाढदिवस म्हटला की आपण ताे कुटुंबात किंवा मित्रपरिवारात थाटाने आनंदाने व उत्साहाने केक कापून साजरा करताे .परंतु उस्मानाबाद येथील वाघमारे परिवारात “अनाेखी परी “या विशेष नावाने आेळखल्या जाणा-या एका शालेय विद्यार्थीने आपला वाढदिवस काल शनिवार दि. २९मे ला घरी साजरा न करता महिला रुग्णलयात साजरा केला . सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांंची ती कन्या असुन या अनोखी परीचा वाढदिवस जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालयात जन्माला आलेल्या बाळांना नवीन कपडे व बाळाच्या मातेला गुलाब पुष्प देऊन साजरा करण्यात आला. कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटात शासनाच्या नियमानुसार तथा जिल्हा प्रशासनाच्या सुचनेच्या अनुषंगाने सर्व काेराेना नियमांचे काटेकाेर पालन करीत हा कार्यक्रम साजरा झाला . ‘काहीजण आजही मुलगी जन्माला आल्यानंतर नैराश्य व,नाराजीचा सूर काढतांना दिसतात ,ही मनोवृत्ती आता बदलली पाहिजे साेबतच स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे ! बेटी बचाओ ! बेटी पढाओ ! ही भावना मनात ठेवायला हवी . ,आज एक मुलगी देश चालवू शकते ,अंतराळात यशस्वी कामगिरी करु शकते हे चित्र आपल्या डाेळ्यांसमाेर आहे आणि ते आपण स्वता बघताेयं आहे .स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे व स्त्री भ्रूणहत्या रोखावयास हवे! स्त्रियांचे रक्षण केले पाहिजे,स्त्री जन्माचे स्वागत व्हायला हवे !असा संदेश ही देण्यांस ही या छाेटी परीसह माेठी मंडळी या वेळी विसरले नाही . दरवर्षी गणेश रानबा वाघमारे हा (अनाेख्या परीच्या) वाढदिवसाचा कार्यक्रम महिला रुग्णालयात राबवित आहेत .ती परंपरा आज ही कायम आहे .जन्मदात्या छाेट्या परीच्या आई वडीलाकडुन राबविण्यांत येणारा हा उपक्रम काैतुकास्पद व वाखण्याजाेगा असल्याचे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिताताई गवळी यांनी काल व्यक्त केले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या कार्यकाळात स्त्री भ्रूणहत्या रोखण्यांत उस्मानाबाद जिल्ह्याने यशस्वी कामगिरी करीत देशात प्रथम क्रमांक पटकाविला होता ही बाब गौरवाची होती,याची आठवण सामाजिक कार्यकर्ता गणेश वाघमारे यांनी आपल्या भाषणातुन या वेळी करुन दिली .कार्यक्रमाला प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्मिता गवळी , परिचारिका भाटे , पल्लवी चव्हाण,अनिता कोळी, पोलिस विभागाचे गुरुनाथ माळी, संजय गजधने ,सचीन चौधरी,दिपक पांढरे,विशाल घरबुडवे उपस्थित होते, या शिवाय या कार्यक्रमाला रुग्णालयातील डाॅक्टर मंडळी व परिचारिका उपस्थित हाेत्या अनेकांनी या वेळी छाेट्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या .शहर वासियांनी या कार्यक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here