भाजप महिला आघाडीच्या वतीने सुपरिचित कवयित्रि वर्षा शेंडेंचा सत्कार

0
478

भाजप महिला आघाडीच्या वतीने सुपरिचित कवयित्रि वर्षा शेंडेंचा सत्कार 

चिमूर (चंद्रपूर), किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या एक जेष्ठ सदस्या तथा शंकरपूर निवासी सुपरिचित कवयित्रि वर्षा अनिल शेंडे यांचा काल शनिवारला महिला आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्षा मायाताई ननावरे यांनी सत्कार केला .शंकरपूरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हा सचिव राजु देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते .

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या वर्षा शेंडे ह्या सदस्या असुन त्यांना पूर्वी पासून कविता शब्दांकित करण्यांचा छंद आहे . त्यांनी आज पावेताे अनेक कविता लिहल्या आहे . या शिवाय वर्षा शेंडे यांनी विदर्भातील अनेक कविसंमेलनात आपला सहभाग नाेंदविला आहे . सहजं सुचलंच्या काव्यकुंजला त्या नियमितपणे लिहित असतात .

केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून किराणा किट वाटपाच्या कार्यक्रमा दरम्यान
कवियत्री वर्षा शेंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यांत आला.

यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव राजू देवतळे, शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख अविनाश बारोकर, ,भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्षा मायाताई ननावरे, माजी न.प .गट नेत्या छायाताई कंचर्लावार ,अनिल शेंडे, सावन गाडगे ,राकेश देवतळे ,जगदिश श्रीरामे ,कँनू बघेल आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here